Raju Srivastav | राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत खास मित्राने दिले मोठे अपडेट…
काल राजू श्रीवास्तव यांच्या लहाण्या भावनाने देखील एक व्हिडीओ तयार करून राजू यांच्या तब्येतीची माहिती लोकांनासोबत शेअर केली आणि राजूच्या तब्येतीमध्ये सुधार होत असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर काही लोक आपल्या फायद्यासाठी राजू संदर्भात अफवा पसरवत असल्याचे सांगितले होते.
मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी एक मोठी बातमी पुढे येते आहे. राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. राजू श्रीवास्तव यांचे कौटुंबिक मित्र अन्नू अवस्थी यांनी ही माहिती दिलीयं. शुक्रवारी कानपूरमध्ये अन्नू अवस्थी (Annu Awasthi) यांनी राजू श्रीवास्तव यांच्या हेल्थचे अपडेट शेअर केले. त्यांनी सांगितले की, राजू पूर्वीपेक्षा चांगला आहे. मी राजू भैय्या यांच्या कुटुंबीयांशी बोललो आहे आणि आता त्यांची तब्येत (Health) खूप सुधारत आहे. यामुळे कोणत्याही अफवांवर अजिबात विश्वास ठेऊ नका आणि राजूच्या चांगला आरोग्यासाठी प्रार्थना करा.
अन्नू अवस्थी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत दिली महत्वाची माहिती
अन्नू हे राजू श्रीवास्तव यांचे जवळचे मित्र तसेच कॉमेडियन आहेत. अन्नूने कॉमेडियन म्हणून तसेच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. भाभी जी घर पर है या मालिकेत अन्नूने भगवती जी लड्डू के भैया आणि अंगूरी भाभी यांच्यासोबत उत्तम भूमिका साकारल्या आहेत. कानपूरच्या लोकांना राजूच्या तब्येतीची माहिती देण्यासाठी अन्नू एक व्हिडिओ बनवत आहेत आणि तो फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर शेअर करत आहे. कानपूरच्या लोकांना राजू भैय्यांच्या तब्येतीची अचूक माहिती मिळावी, अशी अन्नू अवस्थी यांची इच्छा आहे. कालपासून अन्नू सतत एम्समध्ये उपस्थित असलेल्या राजूच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत.
राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा
राजू श्रीवास्तव यांना एम्स दाखल केल्यानंतर त्यांच्या तब्येती संदर्भात विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. इतकेच नाही तर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. काल राजू श्रीवास्तव यांच्या लहाण्या भावनाने देखील एक व्हिडीओ तयार करून राजू यांच्या तब्येतीची माहिती लोकांनासोबत शेअर केली आणि राजूच्या तब्येतीमध्ये सुधार होत असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर काही लोक आपल्या फायद्यासाठी राजू संदर्भात अफवा पसरवत असल्याचे सांगितले होते. राजू यांच्या तब्येतीमध्ये सुधार व्हावा, यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करताना दिसत आहेत.