अनु अग्रवाल हिने अनेक वर्षांनंतर मनातील वेदना केल्या जाहिर, लग्न करायचे होते परंतू…
जाहिरपणे अनुने रिअॅलिटी शोच्या निर्मात्यांविषयी नाराजी व्यक्त केलीये.
मुंबई : सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतो. आता आशिकी फेम अभिनेत्री अनु अग्रवाल हिने शोवर काही आरोप केले आहेत, यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. जाहिरपणे अनुने रिअॅलिटी शोच्या निर्मात्यांविषयी नाराजी व्यक्त केलीये. तिच्या म्हणण्यानुसार या शोमध्ये विकेंडच्या वारसाठी जेंव्हा ती गेली, त्यावेळी तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि तिचे अनेक सीन कट करण्यात आले. यासंदर्भात बोलताना अनु हिने तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल देखील काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
अनु अग्रवाल हिने तिच्या पर्सनल लाईफविषयी देखील काही महत्वाचे खुलासे केले. इतकेच नाही तर लग्न न करण्याचे कारणेही अनुने सांगितले. अनु म्हणाली की, माझे पहिले प्रेम सक्सेस होऊ शकले नाही.
मी पण एका व्यक्तीसोबत प्रेम केले होते. मात्र, मी अनेक प्रयत्न करूनही माझे प्रेम यशस्वी झाले नाही. मला असे वाटते की, आयुष्यामध्ये माणसाला खरे प्रेम हे नेहमीच एकदाच होत असते.
अनु पुढे म्हणाली की, बरेच वर्ष माझा एक बाॅयफ्रेंड होता आणि त्याच्याशी मला लग्न देखील करायचे होते. पण आमच्यामध्ये अशा काही गोष्टी झाल्या की, आमचे लग्न होऊ शकले नाही.
मला बऱ्याच दिवसांनंतर कळाले की, त्याला दुसरे प्रेम देखील झाले. त्यानंतर माझे डोळे उघडले आणि मला कळाले की, आपल्यामध्ये आपण प्रेम शोधले पाहिजे, बाहेरच्या प्रेमाची काय गरज आहे.
मी कधीही लग्न करू शकले असते, पण मी आत्म-विकासाच्या प्रवासाला निघाले, मी विवाह होताना पाहते आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो. माझे झाले नाही, ठीक आहे. पण इतरांचे व्हावे.