Vikram Gokhale | 12 दिवसांपूर्वीच विक्रम गोखले म्हणाले होते की, आयुष्य हे अपूर्ण, वाचा संपूर्ण प्रकरण
काल रात्रीपासूनच एक चर्चा आहे की, विक्रम गोखले यांचे निधन झाले.
मुंबई : मराठी आणि बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले सध्या पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत आहेत. इतकेच नाही तर त्यांची स्थिती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. काल रात्रीपासूनच एक चर्चा आहे की, विक्रम गोखले यांचे निधन झाले. आज सकाळी त्यांच्या पत्नीने हे स्पष्ट केले की, उपचार सुरू असून डाॅक्टर प्रयत्न करत आहेत. विक्रम गोखले यांचे निधन झाले नाही, या फक्त अफवा आहेत. विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
विक्रम गोखले यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून चाहते त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सतत प्रार्थना करताना दिसत आहेत. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
विक्रम गोखले यांनी त्यांच्या करिअरमध्ये फक्त मराठी चित्रपटच नव्हे तर अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये जबरदस्त अशा भूमिका केल्या आहेत. आज विक्रम गोखले यांचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे.
विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळताच त्यांचे नातेवाईक आणि कुटुंबिय रूग्णालयात दाखल झाले आहेत. बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी विक्रम गोखले यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करत, सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.
बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर आणि विक्रम गोखले खूप चांगले मित्र आहेत. अनुपम खेर यांनी विक्रम गोखले यांच्या तब्येतीबाबत कळताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये आणि चाहत्यांना एक मोठी माहिती सांगितली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ ही शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, व्हिडिओमध्ये विक्रम गोखले यांनी वाचलेली कविता अपूर्ण आहे. हीच गोष्ट सांगण्यासाठी त्यांनी विक्रम गोखले यांना फोन केला असता त्यांनी उत्तर दिले की आयुष्य अपूर्ण आहे मित्रा….
अनुपम खेर हे विक्रम गोखले यांचे खूप जवळचे मित्र आहेत. विक्रम गोखले आणि अनुपम खेर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळताच अनुपम खेर यांनी चिंता व्यक्त केली.