The Kashmir Files: प्रभासला ‘द काश्मीर फाइल्स’ची जोरदार टक्कर; निवडक शो असूनही चांगली कमाई

अनुपम खेर (Anupam Kher) यांची मुख्य भूमिका असलेला 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात 1990 च्या नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा मांडण्यात आली आहे.

The Kashmir Files: प्रभासला 'द काश्मीर फाइल्स'ची जोरदार टक्कर; निवडक शो असूनही चांगली कमाई
The Kashmir Files Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 12:09 PM

अनुपम खेर (Anupam Kher) यांची मुख्य भूमिका असलेला ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात 1990 च्या नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा मांडण्यात आली आहे. भारतीय इतिहासातील सर्वात दुःखद घटनांपैकी ही एक घटना आहे. या चित्रपटाच्या पॉवर-पॅक ट्रेलरने काश्मीरमध्ये धडकी भरवणाऱ्या दहशतीची, गोंधळाची झलक दाखवून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित होताच, सोशल मीडियावर त्याची चर्चा होऊ लागली. स्पेशल स्क्रिनिंगमध्ये प्रेक्षकांचे डोळे पाणावले. या सर्वांचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवरही झाला. देशभरात निवडक शो असूनही विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. देशभरात जवळपास 630 स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसाचा आकडा पाहता दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही चांगली कमाई होऊ शकेल, असा अंदाज तरण आदर्शने व्यक्त केला आहे.

विवेक रंजन अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री पल्लवी जोशी, प्रकाश बेलवाडी, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, भाषा सुंबळी, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वी सरनाविक यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यानंतर सत्य समोर येईल, असा दावा विवेक अग्निहोत्री यांनी केला होता. काश्मीरच्या समस्येवरील निराकरणाला राजकारणाशी जोडून पाहणं चुकीचं ठरेल, असं ते म्हणाले होते. लोकशाहीत राजकारण हे व्होट बँकवर चालतं. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये पंडितांची व्होट बँक नाही, त्यामुळे कदाचित त्या समस्येचं निराकरण होऊ शकलं नाही, असं ते जम्मूमध्ये म्हणाले होते.

हेही वाचा:

आठवणीही नकोत; समंथाने नाग चैतन्यला परत केली लग्नातली साडी?

नागराजमुळे त्या पठ्ठ्याचं आयुष्यच बदललं; 20 वर्षीय मुलाचं स्वप्न साकार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.