Anushka Sharma: मालदिवच्या समुद्रकिनारी वामिकासोबत अनुष्काची सायकल सफर; पहा Video
या व्हिडीओमध्ये अनुष्का वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये सायकलिंग करताना दिसतेय. मालदिवच्या समुद्रकिनारी सायकलिंग करणं तिला खूपच आवडल्याचं यात दिसून येतंय. 'माझ्या दोन आवडत्या व्यक्तींसोबत माझ्या खास आठवणी' असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही पती विराट कोहली (Virat Kohli) आणि एक वर्षाची मुलगी वामिका (Vamika) यांच्यासोबत नुकतीच मालदिवला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती. या व्हेकेशनचा एक खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती वामिकासोबत सायकल चालवताना पहायला मिळतेय. आपली सुट्टी किंवा व्हेकेशन कधीच संपू नये असं प्रत्येकाला वाटतं. हीच भावना व्यक्त करत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अनुष्का सध्या तिच्या ‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगमधून काही वेळ ब्रेक घेत तिने कुटुंबीयांसोबत मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटला. विराटनेही सोशल मीडियावर या व्हेकेशनचा फोटो पोस्ट केला होता.
या व्हिडीओमध्ये अनुष्का वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये सायकलिंग करताना दिसतेय. मालदिवच्या समुद्रकिनारी सायकलिंग करणं तिला खूपच आवडल्याचं यात दिसून येतंय. ‘माझ्या दोन आवडत्या व्यक्तींसोबत माझ्या खास आठवणी’ असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. यावेळी तिने ऑरेंज स्विमसूट परिधान केलं आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केले आहेत. ‘किती सुंदर ही जागा आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘बॅकसीटवर बसलेली वामिका’ असं लिहित एका युजरने हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. अनुष्काच्या या सायकलवर मागच्या सीटवर वामिकाला बसवण्यात आलं आहे. मात्र या व्हिडीओत वामिकाचा चेहरा मात्र दिसून येत नाही.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
अनुष्काने याआधीही बीचवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. विराट कोहलीनेच तिचे हे फोटो क्लिक केले होते. सुट्ट्यांवरून घरी परतत असताना कलिना एअरपोर्टवर काही पापाराझींनी वामिकाचे फोटो क्लिक केले होते. काही माध्यमांनी ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले नाहीत, तर काहींनी ते पब्लिश केले. यावरून अनुष्काने नाराजी व्यक्त केली. विराट आणि अनुष्काने याआधीही पापाराझींना वामिकाचे फोटो पोस्ट न करण्याची विनंती केली होती.
2018 मध्ये अनुष्का शर्माचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये तिने शाहरुख खानसोबत भूमिका साकारली होती. आता चार वर्षांनंतर ती मोठ्या पडद्यावर परत येणार आहे. ‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटात ती भारतीय महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे.