अखेर अरबाज खान याने मुलगा अरहान खानच्या बाॅलिवूड एन्ट्रीबाबत दिले मोठे संकेत

करण जोहर हा अरहान खानला लाॅन्च करणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, आता यावर स्वत: अरबाज खान याने मोठे भाष्य केले आहे.

अखेर अरबाज खान याने मुलगा अरहान खानच्या बाॅलिवूड एन्ट्रीबाबत दिले मोठे संकेत
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 10:56 PM

मुंबई : अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खान हा लवकर बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येत आहेत. करण जोहर हा अरहान खानला लाॅन्च करणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, आता यावर स्वत: अरबाज खान याने मोठे भाष्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून बाॅक्स आॅफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात असतानाच करण जोहर अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खानला लाॅन्च करणार आहे.

अरहान खान बाॅलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार असल्याच्या चर्चांवर आता अरबाज खानने खुलासा केलाय. एका मुलाखतीमध्ये अरबाज खान म्हणाला की, जर माझा मुलगा मला उद्या म्हटला की, मला शेफ व्हायचे आहे तर मी त्याला नक्कीच मदत करेल.

माझ्या मुलावर कोणताच दबाव अजिबात नाहीये. त्याला जे काही बनायचे आहे ते तो बनू शकतो आणि त्याला मी नक्कीच मदत करेल. सध्या तो अमेरिकेमध्ये चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेत आहे.

त्याच्या प्रत्येक निर्णयात मी त्याच्यासोबत 100 टक्के असणार आहे. त्याला जर शेफ होण्याची इच्छा असेल तर मी त्याच्यासाठी हाॅटेल टाकून देईल, जो काही निर्णय असेल तो फक्त आणि फक्त अरहानचाच असणार आहे.

पुढे अरबाज खान म्हणाला की, मी माझ्या मुलाला शक्यतो जास्त सल्ला देत नाही. कारण पुढे आयुष्यामध्ये त्याला काही निर्णय घ्यायचे असतील तर तो घ्यायला घाबरेल. यामुळेच त्याचे निर्णय मी त्यालाच घेऊ देतो.

अरबाज खान म्हणाला की, मी जर माझ्या मुलाला म्हणालो की, तू अभिनेता बनू शकत नाहीस. तर मी त्याचे स्वप्न भंग केल्यासारखेच होणार ना. यामुळे म्हणतोय की, त्याचा जो काही निर्णय असेल त्यामध्ये मी त्याचा सोबत असणार आहे.

म्हणजेच काय तर आता अरबाज खान याने स्पष्ट संकेत दिले आहेत की, जर अरहान खानला अभिनेता व्हायचे असेल तर अरबाज खान त्याचा पूर्णपणे सपोर्ट करून त्याला मदत करणार आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....