Arbaaz Khan | अरबाज खान याचा निशाणा नेमका कोणावर? थेट म्हणाला शाहरुख खान याचे कुटुंबिय
शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होऊन एक महिना झाला आहे, तरीही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल क्रेझ बघायला मिळतंय. शहजादा आणि सेल्फी हे दोन चित्रपट पठाण चित्रपटानंतर रिलीज झाले होते.
मुंबई : शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने ओपनिंग डेलाच धमाकेदार कामगिरी केली. जगभरातून तब्बल 100 कोटीचे कलेक्शन करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. विशेष म्हणजे शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला आणि शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला. परत शाहरुख खान हा बाॅलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार की नाही हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. मात्र, धडाकेबाज पध्दतीने शाहरुख खान याने चार वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या याच पुनरागमनाची वाट पाहात होते.
शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होऊन एक महिना झाला आहे, तरीही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल क्रेझ बघायला मिळतंय. शहजादा आणि सेल्फी हे दोन चित्रपट पठाण चित्रपटानंतर रिलीज झाले होते. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पठाण चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत.
पठाण चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख खान याचे काैतुक मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सलमान खान याचा भाऊ अरबाज खान यानेही पठाण चित्रपटासाठी शाहरुख खान याचे काैतुक केले आहे आणि याची गरज असल्याचे देखील त्याने म्हटले. इतकेच नाही तर त्याने बाॅलिवूडला एकाप्रकारे आरसा दाखवण्याचेही काम केले.
चॅट शोमध्ये द इनविसिबल सीरीजमध्ये बोलताना अरजाब खान म्हणाला की, सध्याची हवा लक्षात घेता, हे खूप महत्वाचे होते… पठाणच्या यशाची वेळ अगदी बरोबर ठरली आहे…विशेष म्हणजे शाहरुख खान याच्यासाठी हे अत्यंत महत्वाचे होते. कारण गेल्या दोन वर्षांपासून फक्त शाहरुख खान हाच नाहीतर त्याच्या कुटुंबियांनीही खूप काही सहन केले आहे.
शाहरुख खान याचे कुटुंब दोन वर्षांपासून खूप वेगळ्या परिस्थितीमधून जात होते. मात्र, पठाणच्या यशानंतर त्याची परतफेड झालीये. मी स्वत: मध्यरात्री पठाण हा हाऊसफुल्ल चित्रपट बघितला आहे. कारण हा चित्रपट अप्रतिम आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याने या चित्रपटासाठी स्वत: ला पूर्णपणे झोकून दिले आहे.
पुढे अरबाज खान म्हणाला की, शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने दाखवून दिले आहे की, चांगला चित्रपट प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणतो. पठाण चित्रपटाने भारतामध्ये 526 कोटींचे कलेक्शन बाॅक्स आॅफिसवर केले. जगभरातून पठाण चित्रपटाने 1021 कोटीचे कलेक्शन केले आहे. अजूनही चित्रपटाची जादू बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळत आहे.