Arijit Singh Concert | महिलेच्या एका कृत्यामुळे अरिजीत सिंह याला मोठी दुखापत, गायक संतापला, व्हिडीओ व्हायरल, थेट कॉन्सर्टमध्येच

गायक अरिजीत सिंह याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अरिजीत सिंह याच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अरिजीत सिंह याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.

Arijit Singh Concert | महिलेच्या एका कृत्यामुळे अरिजीत सिंह याला मोठी दुखापत, गायक संतापला, व्हिडीओ व्हायरल, थेट कॉन्सर्टमध्येच
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 8:56 PM

मुंबई : प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याला मोठी दुखापत झालीये. अरिजीत सिंह (Arijit Singh) याच्या हाताला ही दुखापत झाली असून याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. शो दरम्यान ही दुखापत अरिजीत सिंह याला झाली. हा व्हिडीओ (Video) पाहून अनेकांनी संताप देखील व्यक्त केलाय. अरिजीत सिंह याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following बघायला मिळते. विशेष म्हणजे अरिजीत सिंह हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय देखील असतो. अरिजीत सिंह याच्या शोला चाहत्यांची मोठी गर्दी असते. अरिजीत सिंह याच्या शोची तिकिटे देखील सहज मिळत नाहीत. अरिजीत सिंह याच्या शोबद्दल चाहत्यांमध्ये कायमच मोठी क्रेझ ही बघायला मिळते.

अरिजीत सिंह याचा नुकताच एक शो पार पडलाय. अरिजीत सिंह कायमच शो दरम्यान आपल्या चाहत्यांना हात मिळवताना आणि गप्पा मारताना दिसतो. मात्र, आता याच सवयीमुळे अरिजीत सिंह याला मोठी दुखापत झालीये. त्याचे झाले असे की, शो दरम्यान अरिजीत सिंह याचा बळजबरीने एक महिला हात पकडताना दिसली.

अरिजीत सिंह याला हात मिळवायचा नव्हता. मात्र, ती महिला अरिजीत सिंह याचा हात ओडते. यामुळे अरिजीत सिंह याचे बॅलेन्स गेले आणि त्याच्या हाताला मोठी दुखापत झाली. यानंतर अरिजीत सिंह हा त्या महिलेला बोलताना दिसत आहे. अरिजीत सिंह त्या महिलेला म्हणतो की, तुमच्या अशा वागण्यामुळे मला आता माझा हात देखील हालवता येत नाहीये.

तुम्ही माझा हात का ओढला? मी हाताची हालचाल देखील करू शकत नाही. तुमच्या अशा वागण्याने शो रद्द देखील होऊ शकतो. यावेळी ती महिला अरिजीत सिंह याला माफी मागताना देखील दिसत आहे. यापुढे अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे. कारण असेच होत राहिले तर मी शो कसा करणार ना? मला नेहमीच वाटते की, मी शो दरम्यान सर्वांना बोलले पाहिजे. मात्र, हा प्रकार चुकीचा आहे.

अरिजीत सिंह याचे हे बोलणे ऐकून ती महिला अरिजीत सिंह याला माफी मागताना दिसत आहे. आता अरिजीत सिंह याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अरिजीत सिंह याच्या या शोमध्ये एका मुलीने तिच्या बाॅयफ्रेंन्डला लग्नासाठी प्रपोज केल्याचे देखील दिसत आहे. याचा देखील व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.