Arjun Kapoor : श्रीदेवीच्या मृत्यूनंतर बदललं अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूरचं नातं, अर्जुन म्हणाला- सुरुवातीला आम्ही…

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अर्जुन कपूरने जान्हवी कपूर आणि खुशी कपूरला पूर्ण साथ दिली. त्यांच्या दुःखाच्या वेळी तो नेहमी त्यांच्यासोबत होता. (Arjun Kapoor and Janhvi Kapoor's relationship changed after Sridevi's death)

Arjun Kapoor : श्रीदेवीच्या मृत्यूनंतर बदललं अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूरचं नातं, अर्जुन म्हणाला- सुरुवातीला आम्ही…
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 10:03 AM

मुंबई : श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि खुशी कपूरला (Khushi Kapoor) पूर्ण साथ दिली. त्यांच्या दुःखाच्या वेळी तो नेहमी त्यांच्यासोबत होता. एवढंच नाही तर आजही जर कोणी दोन्ही बहिणींना ट्रोल केलं तर अर्जुन त्यांचा क्लास घेतो. अनेक मुलाखतींमध्ये अर्जुन जान्हवी आणि खुशीबद्दल बोलला आहे.

नुकतंच अर्जुन आणि जान्हवीनं एका मासिकासाठी फोटोशूट केलं आहे. या फोटोशूट दरम्यान, दोघांनी एकमेकांशी असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. दोघांचं म्हणणं आहे की त्यांचे संबंध काळानुसार बदलले आहेत.

अर्जुन आधी जान्हवी आणि खुशीसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल म्हणाला होता, ‘पूर्वी आम्ही भेटायचो, पण कधी छान गोष्टी घडल्या नाहीत. आमच्यात शांतता असायची. ” तर जान्हवी म्हणाली, ‘मी माझ्या कुटुंबाकडून खूप काही शिकले आमचे दोघांचे एकच वडिल आहे. आमच्यामध्ये एकच रक्त आहे आणि कोणीही ते आमच्याकडून हिसकावू शकत नाही.

जान्हवी म्हणते की तिला अर्जुन आणि अंशुलासोबत राहणे सुरक्षित वाटते. जान्हवी म्हणाली, ‘अर्जुन भाई आणि अंशुला दीदीसोबत राहणं मला खूप आरामदायक वाटतं. जेव्हा मी दररोज उठते, तेव्हा मला माहित आहे की मला या दोघांचा पाठिंबा आहे.

आम्ही परिपूर्ण कुटुंब नाही

याआधी एका मुलाखतीत अर्जुन म्हणाला होता की आम्ही प्रत्येक गोष्टी पाहत आहोत आणि गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करत आहोत. अर्जुन म्हणाला होता, ‘जर मी असं म्हणालो की आम्ही एक परिपूर्ण कुटुंब आहोत, तर ते चुकीचे ठरेल. आम्ही अजूनही स्वतंत्र कुटुंब आहोत आणि एकमेकांसोबत राहण्याचा प्रयत्न करतो आहोत. जेव्हा आम्ही एकत्र असतो, तेव्हा आम्हाला खूप मजा येते, पण मी असं म्हणणार नाही की आम्ही एकच युनिट आहोत. सर्व काही परिपूर्ण आहे असं सांगून मी खोटे बोलणार नाही.

सध्या जरी अर्जुन, अंशुला, जान्हवी आणि खुशी कपूर एकत्र वेळ घालवतात आणि एकमेकांना आधार देतात, तरीही त्यांचे बंधन इतकं खोल नाही.

दोघांचं व्यावसायिक आयुष्य

अर्जुन आणि जान्हवीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर अर्जुन लास्ट सरदार का ग्रॅन्डसनमध्ये दिसला होता. या चित्रपटात अर्जुनसोबत रकुल प्रीत सिंह आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होत्या. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता अर्जुन भूत पोलीस या चित्रपटात दिसणार आहे.

त्याचबरोबर जान्हवी शेवटी रुही चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात जान्हवीची दुहेरी भूमिका होती आणि त्याच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत होते. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता जान्हवी ‘गुड लक जेरी’ आणि ‘दोस्ताना 2’ चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

संबंधित बातम्या

Photo : स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी करीना कपूरचा फिटनेस मंत्रा, नियमित योगा करण्यावर देते भर

Good News : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या जीवनावर आधारित चित्रपटाची तयारी, अभिनेत्रीचा शोध सुरू

Zareen Khan : जरीन खानचा दिलकश अंदाज, सोशल मीडियावर चाहते घायाळ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.