Arjun Kapoor: ‘पोट फार वाढलंय रे, कमी करायचंय’ असं नुसतं म्हणून होत नाही, अर्जून कपूरकडे बघा आणि शिका!

एका फोटोमध्ये अर्जुन फिट आणि मस्क्यूलर दिसतोय. तर दुसऱ्या फोटो एका खात्यापित्या घरातल्या मुलाप्रमाणे त्याचं पोट सुटल्याचं दिसतंय.

Arjun Kapoor: 'पोट फार वाढलंय रे, कमी करायचंय' असं नुसतं म्हणून होत नाही, अर्जून कपूरकडे बघा आणि शिका!
अर्जुन कपूर फिट अंदाजImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 12:24 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत अर्जून कपूरनं (Arjun Kapoor) नवा लूक त्यांच्या चाहत्यांना सुखावणारा आहे. आपल्या फिटनेससाठी (Fitness) ओळखली जाणारी मलाईका अरोरा हीचा आदर्श आता अर्जून कपूरनही घेतलाय की काय? अशी शंका घेतली गेली, तर आश्चर्य वाटायला नको. कारण 15 महिन्यांपूर्वी अर्जून कपूर जसा दिसत होता, त्यापेक्षा अधिक तरुण, अधिक फिट आणि अधिक क्युट तो आता दिसत असल्याचं त्याला स्वतःलाच जाणवलंय. 15 महिन्यांची मेहनत फळाला आल्याचंही त्यानं मान्य केलंय. अर्थात हा प्रवास सोपा नव्हता. वजन कमी करणं खायची गोष्ट नाही, असं म्हणतात, ते उगाच नाही. अर्जुन कपूरलाही याची जाणीव मागच्या पंधरा महिन्यात झालीच आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर फोटो (Instagram) शेअर करत आपल्या नव्या लूकनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पण या फोटोत त्यानं स्वतःच आपल्या छातीवर केसांवरही लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

वाचा अजून कपूरनं काय म्हटलं?

अर्जून कपूरनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, की..

गेल्या 15 महिन्यात प्रचंड मेहनत घेतली आहे. ही मेहनत घेताना त्रासही फार झाला. हा प्रवास सोपा नव्हता. पण आता 15 महिन्यांनंतर जे मी साध्य केलंय, त्याचं फळ जपण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ही एक प्रदीर्घ प्रक्रिया होती. फेब्रुवारी 2021 पासून 2022 पर्यंत घेतलेल्या मेहनतीनं मला प्रचंड बळ दिलंय. या मी घडलोय. आणि हो, यात माझ्या छातीवरील केसांचाही समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

या पोस्ट सोबत अर्जून कपूरने दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अर्जुन फिट आणि मस्क्यूलर दिसतोय. तर दुसऱ्या फोटो एका खात्यापित्या घरातल्या मुलाप्रमाणे त्याचं पोट सुटल्याचं दिसतंय. सुटलेलं पोट आता पूर्णपणे शेपमध्ये आल्याचं अर्जून कपूरच्या नव्या फोटोंमध्ये दिसून आलंय.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

गेल्या काही काळापासून अर्जुन कपूर जीममध्ये व्यायाम करताना वेळोवेळी दिसून आला होता. त्यानं सातत्यानं वर्कआऊट करतानाचे व्हिडीओही इन्स्टाग्रावरुन शेअर केले होते.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.