Arjun Kapoor : शालेय दिवसांमध्ये अर्जुन कपूरला सहन करावा लागला त्रास, शाळेतील मुलं म्हणायचे ‘तेरी तो नई माँ आई हैं…’
अर्जुन कपूरनं एका मुलाखतीत हे सांगितलं आहे की त्याचे बालपणातील काही दिवस त्याच्यासाठी कधीही न विसरले जाणारे आहेत. (Arjun Kapoor had to endure hardships during school days, school children used to say 'Teri to nai maa aayi hain ...')
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांचा मुलगा, अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) आणि संजय कपूर (Sanjay Kapoor) यांचा पुतण्या आहे. स्टार किड असूनही त्यानं बरीच मेहनत केली आणि बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावलं. बोनी कपूरची पहिली पत्नी मोना शौरी कपूरपासून विभक्त झाल्यानंतर अर्जुनचं बालपण अनेक संकटांमधून गेलं. त्याच्या वडिलांनी अभिनेत्री श्रीदेवीशी (Shridevi) लग्न केलं, त्यानंतर शाळेच्या काळात त्याला खूप तणावातून जावं लागलं. श्रीदेवीच्या निधनानंतरही तो जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि खुशी कपूरच्या (Khushi Kapoor) जवळ आला असल्याचं त्यानं उघड केलं आहे. सोबतच ही दोन स्वतंत्र कुटुंब आहेत आणि एकत्र राहण्याचा प्रयत्न करत आहेत असंही तो म्हणाला.
‘बालपणी अनेक अडचणी’ अर्जुन कपूरनं हे सांगितलं आहे की त्याचे बालपणातील काही दिवस त्याच्यासाठी कधीही न विसरले जाणारे आहेत. बॉलिवूड बबलशी बोलताना तो म्हणाला की माझं बालपण वैयक्तिक व्यथा, आघात आणि उलथापालथातून गेलं आहे. मी मोठा होत असताना मला माझ्या आईवडिलांच्या विभक्त होण्यातून जावं लागलं. त्यावेळी माझ्यासाठी हे खूप कठीण होतं कारण माझे वडील एक उच्च व्यक्तिमत्त्व आणि त्यांनी ज्या स्त्रीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता ती भारताची सर्वात मोठी सुपरस्टार होती.
‘मुलांच्या प्रश्नांनी शालेय दिवसांत झाला त्रास’ तो म्हणाला, “शाळेच्या दिवसात जेव्हा मुलं मला विचारायचे, ‘तेरी तो नई माँ आई है … कैसा महूसस होता है?’ हे ऐकणं सोपे नव्हतं. या गोष्टी त्रास द्यायच्या आणि त्यामुळे आम्ही या गोष्टींबद्दल अधिक संवेदनशील बनलो. मात्र हे वास्तव आहे.
‘आम्ही अद्याप दोन स्वतंत्र कुटुंब आहोत’ आपल्या मुलाखतीत तो पुढे म्हणाला की जर मी असं म्हटलं की आम्ही एक आदर्श कुटुंब आहोत तर ते अगदी चुकीचं ठरेल. आम्ही अद्याप एकत्रित येण्याचा आणि एकत्र राहण्याचा प्रयत्न करत असलेली दोन स्वतंत्र कुटुंबं आहोत. आमची विचारसरणी वेगळी आहे. तो म्हणाला की मला सर्व काही परिपूर्ण आणि उत्तम आहे असं बोलणं म्हणजे खोटं बोलल्या सारखं होईल. आम्ही अजूनही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
बोनी कपूर यांनी 1983 साली मोना सूरीशी लग्न केलं आणि 1996 मध्ये घटस्फोट झाला. पहिल्या लग्नापासून त्यांना दोन मुले आहेत, मुलगा अर्जुन कपूर आणि मुलगी अंशुला कपूर. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी 1996 मध्ये श्रीदेवीशी लग्न केले. श्रीदेवी लग्नाच्या वेळी 6 महिन्यांची गरोदर होती.
संबंधित बातम्या
विवाहित आदित्य पांचोलीच्या प्रेमात पडली होती कंगना रनौत, मारहाणीच्या घटनेनंतर तुटलं नातं!