Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Kapoor: “हे अति होऊ लागलंय, इंडस्ट्रीने याविरोधात एकत्र येण्याची गरज”; बॉयकॉट ट्रेंडवर अर्जुन कपूरने व्यक्त केली नाराजी

या बॉयकॉटच्या ट्रेंडवर अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाला. या बॉयकॉट ट्रेंडविरोधात बॉलिवूड इंडस्ट्रीने (Bollywood Industry) एकत्र येण्याची गरज आहे, असं त्याने म्हटलंय.

Arjun Kapoor: हे अति होऊ लागलंय, इंडस्ट्रीने याविरोधात एकत्र येण्याची गरज; बॉयकॉट ट्रेंडवर अर्जुन कपूरने व्यक्त केली नाराजी
बॉयकॉटच्या ट्रेंडवर अभिनेता अर्जुन कपूर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाला.Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 10:34 AM

सध्या सोशल मीडियावर ‘बॉयकॉट’चा ट्रेंड (Boycott Trend) सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’वर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटालाही विरोध होऊ लागला. या ट्रेंडमध्ये हृतिक रोशनचा ‘विक्रम वेधा’ आणि अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांचाही समावेश झाला. कोणता ना कोणता कारण शोधून या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. या बॉयकॉटच्या ट्रेंडवर अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाला. या बॉयकॉट ट्रेंडविरोधात बॉलिवूड इंडस्ट्रीने (Bollywood Industry) एकत्र येण्याची गरज आहे, असं त्याने म्हटलंय.

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, “मला असं वाटतं की आम्ही त्याबद्दल मौन बाळगून मोठी चूक केली आहे. खरं तर ही आमची शालीनता होती, पण लोकांनी आता त्याचा फायदा उचलण्यास सुरुवात केली आहे. आम्ही आमच्या कामानेच उत्तर देऊ, असा विचार केला, पण तीच चूक ठरली. तुम्हाला नेहमीच त्या घाणीत उतरण्याची गरज नसते. पण आम्ही त्याला खूप सहन केलंय आणि लोकांना आता त्याचीच सवय झाली आहे. आम्हाला एकत्र येऊन याविरोधात काहीतरी करण्याची खूप गरज आहे. कारण लोक आमच्याबद्दल जे लिहितात ते सत्यापेक्षा फार वेगळं काहीतरी आहे. आता हे सर्व अति होऊ लागलं आहे, हे चुकीचं आहे.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

“शुक्रवारी जेव्हा एखादा चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा प्रेक्षकांमध्ये जी उत्सुकता असते, तीच या इंडस्ट्रीची खरी चमक आहे. पण आता या ट्रेंडमुळे ती चमक उतरत चालली आहे. सतत चिखल उडवत राहाल तर नवीन गाडीची चमकसुद्धा नाहीशी होईल ना? गेल्या काही वर्षांत आमच्यावर तर खूप चिखलफेक झाली. कारण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत राहिलो. एकदा चित्रपट प्रदर्शित झाला, तर लोकांचा दृष्टीकोन बदलेल असं आम्हाला वाटत होतं”, अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली.

अर्जुनचा ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. यामध्ये त्याच्यासोबत जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांच्याही भूमिका होत्या. त्याचे ‘कुत्ते’ आणि ‘द लेडीकिलर’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कुत्ते या चित्रपटात कोंकना सेन शर्मा, राधिका मदन, नसीरुद्दीन शाह आणि तब्बू यांच्याही भूमिका आहेत. तर ‘द लेडीकिलर’ या चित्रपटात अर्जुनसोबत भूमी पेडणेकर दिसणार आहे.

एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल.
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू.
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक.
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प.
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू.
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका.
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज.
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.