Arjun Kapoor: “मलायकाशी लग्न करण्याचा अद्याप विचार नाही कारण..”, ‘कॉफी विथ करण 7’मध्ये अर्जुन कपूरने केलं स्पष्ट

कॉफी विथ करणमध्ये सेलिब्रिटींमध्ये नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्याविषयी प्रश्न विचारले आहेत. करण जोहरने या संधीचा पुरेपूर फायदा घेत अर्जुनला त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराविषयी (Malaika Arora) बरेच प्रश्न विचारले.

Arjun Kapoor: मलायकाशी लग्न करण्याचा अद्याप विचार नाही कारण.., 'कॉफी विथ करण 7'मध्ये अर्जुन कपूरने केलं स्पष्ट
Arjun and MalaikaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 11:32 AM

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या बहुचर्चित ‘कॉफी विथ करण 7’च्या (Koffee With Karan) नव्या एपिसोडमध्ये अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) हजेरी लावली. या नव्या सिझनचा सहावा एपिसोड गुरुवारी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित झाला. यावेळी शोमध्ये अर्जुनसोबत त्याची चुलत बहीण आणि अभिनेत्री सोनम कपूरसुद्धा उपस्थित होती. कॉफी विथ करणमध्ये सेलिब्रिटींमध्ये नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्याविषयी प्रश्न विचारले आहेत. करण जोहरने या संधीचा पुरेपूर फायदा घेत अर्जुनला त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराविषयी (Malaika Arora) बरेच प्रश्न विचारले. मलायकासोबतचं नातं जगजाहीर करण्याचं कधी ठरवलं, कोणाकोणाला त्याबद्दल माहिती होती आणि लग्नाबद्दल काय विचार आहेत, अशा विविध प्रश्नांची उत्तर अर्जुनने या चॅट शोमध्ये दिली.

मलायकाशी इतक्यात लग्न करण्याचा कोणताच विचार नसल्याचं अर्जुनने स्पष्ट केलं. सध्या तो करिअरवर अधिक लक्ष केंद्रीत करत असल्याचं त्याने पुढे सांगितलं. “नाही, आणि प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास लॉकडाऊनमध्ये गेलेली दोन वर्षं, कोरोना महामारी आणि त्यामुळे बदललेल्या गोष्टी कारणीभूत आहेत. मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं आहे”, असं अर्जुन म्हणाला.

हे सुद्धा वाचा

“मी एक अत्यंत वास्तववादी व्यक्ती आहे करण, मला काहीही लपवण्याची गरज नाही. मी कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. मला खरोखर व्यावसायिकदृष्ट्या थोडं अधिक स्थिर व्हायला आवडेल. मी आर्थिकदृष्ट्या बोलत नाही, मी भावनिकदृष्ट्या या गोष्टींचा विचार करत आहे. मला असं काम करायला आवडेल ज्यातून मला आनंद मिळेल. कारण मी स्वत: आनंदी असल्यास, माझ्या जोडीदारालाही मी आनंदी ठेवू शकेन. मी सुखी जीवन जगू शकतो आणि मला वाटतं की माझा बराचसा आनंद हा मला माझ्या कामातून येतो,” असं अर्जुनने स्पष्ट केलं.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

मलायकाने अर्जुनच्या आजीची भेट घेतल्याचंही त्याने या एपिसोडमध्ये सांगितलं. दोघांनीही त्यांचं नाते त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना सांगण्यापूर्वी पुरेसा वेळ घेतला होता. कारण त्यांना त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आणि खासकरून मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान आणि त्याच्या कुटुंबीयांबद्दल विचार करून पाऊल पुढे ठेवायचं होतं. त्यानंतर दोघांनी आपलं नातं सर्वांसमोर उघड करण्याचा निर्णय घेतला.

अर्जुनच्या वाढदिवशी सोशल मीडियावर पोस्ट लिहित मलायकाने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा पार्ट्यांमध्येही या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. इतकंच नव्हे तर या दोघांच्या लग्नाच्या चर्चाही सोशल मीडियावर होत असतात.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.