मुंबई : अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला आहे. तेंव्हापासून मलायका अरोरा ही अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. इतकेच नाही तर दोघे कायमच सोबत स्पाॅट होतात आणि फिरायलाही सोबतच जातात. मलायका अरोरा तिच्या बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत असते. परंतू आता थोड्या वेगळ्या प्रकरणामुळे मलायका ही चर्चेत आलीये.
मलायका अरोरा ही प्रेग्नेंट आहे आणि काही महिन्यामध्ये ती अर्जुन कपूर याच्या बाळाला जन्म देणार असल्याच्या चर्चांना प्रचंड उधाण आले आहे. सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिच्या प्रेग्नेंसीबद्दल चर्चां रंगत आहेत.
काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सुट्टया घालवण्यासाठी लंडनला गेले होते. त्यावेळी त्यांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी मलायकाने प्रेग्नेंट असल्याचे तिच्या जवळच्या व्यक्तींना सांगितले होते, अशी चर्चा आहे.
मलायका खरोखरच अर्जुन कपूरच्या पहिल्या बाळाची आई होणार का? हा प्रश्न सातत्याने तिला विचारला जातोय. मात्र, आता यावर मलायकाच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने या सर्व फक्त अफवा असल्याचे सांगून टाकले आहे.
काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा ही एका शोमध्ये बोलताना म्हणाली होती की, अरबाज खानसोबत घटस्फोट घेणे माझ्यासाठी सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. कारण आमच्या या निर्णयाचा परिणाम आमच्या कुटुंबावर होणार होता.
आजही आपल्या समाजामध्ये एखाद्या घटस्फोटीत महिलेकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते. परंतू महिलांनी स्वत: जे योग्य वाटते तेच करायला हवे. कोण काय म्हणेल याचा विचार अजिबातच करायला नको.
माझ्या आणि अरबाजच्या घटस्फोटाच्या वेळी मला माझ्या मुलाचा विचार येत होता. कारण या सर्व गोष्टींना तो कसा सामोरे जाईल, याची कल्पना मला अजिबात नव्हते. त्यावेळी माझ्या मनात असंख्य विचार सुरू होते.