#ArrestSunnyLeone | सनी लिओनीला अटक करा! सोशल मीडियावर जोरदार मागणी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या (Sunny Leone) 'मधुबन मी राधिका नाचे' या गाण्यावरून मध्य प्रदेशात विरोध सुरू झाला आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सनी लिओनला इशारा देत माफी मागण्यास सांगितले होते. हिंदू देवतांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे ते म्हणाले होते.

#ArrestSunnyLeone | सनी लिओनीला अटक करा! सोशल मीडियावर जोरदार मागणी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
Sunny Leone (Image :Twitter)
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 11:20 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या (Sunny Leone) ‘मधुबन मी राधिका नाचे’ या गाण्यावरून मध्य प्रदेशात विरोध सुरू झाला आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सनी लिओनला इशारा देत माफी मागण्यास सांगितले होते. हिंदू देवतांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे ते म्हणाले होते. सनी लिओनीच्या नवीन गाण्याबाबत राज्य सरकार कायदेशीर सल्लाही घेत असून जर सनी लिओनीने 3 दिवसांत गाण्याबद्दल माफी मागितली नाही आणि गाणे यूट्यूबवरून हटवले नाही, तर मध्य प्रदेश सरकार एफआयआर दाखल करेल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आता ट्विटरवर #ArrestSunnyLeone असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

नरोत्तम मिश्रा यांच्याकडून मिळालेल्या या इशाऱ्यानंतर सारेगामाने सोशल मीडियावर अधिकृत निवेदन जारी केले आहे. म्युझिक लेबलने आपल्या निवेदनात लिहिले आहे की, आपल्या देशवासीयांच्या अलीकडील प्रतिक्रिया आणि भावनांचा आदर करून आम्ही मधुबन गाण्याचे नाव आणि बोल बदलू. येत्या 3 दिवसात सर्व प्लॅटफॉर्मवर जुन्या गाण्याऐवजी नवीन गाणे सादर केले जाईल. मात्र, आता नेटकरी देखील संतापले आहेत आणि ते अभिनेत्रीला अटक करण्याची मागणी करत आहेत.

‘मधुबनम में राधिका नाचे रे’वरून उत्तर प्रदेशातही वाद!

यावेळी अभिनेत्री सनी लिओनी तिच्या  ‘मधुबनम में राधिका नाचे रे’ या नवीन गाण्यावरून वादात सापडली आहे. सर्वप्रथम उत्तर प्रदेशातील मथुरेत या गाण्याला तीव्र विरोध झाला. 22 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या सनी लिओनीच्या या व्हिडीओ अल्बमवर बंदी घालण्याची मागणी अनेकांनी केली आहे. या गाण्यावर कारवाई करण्याची मागणी वृंदावनचे संत नवल गिरी महाराज यांनी सरकारकडे केली आहे.

सरकारने अभिनेत्रीवर कारवाई केली नाही आणि व्हिडीओवर बंदी घातली नाही, तर न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सनीने माफी मागितली नाही, तर तिला देशात राहू दिले जाणार नाही. अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पाठक म्हणाले की, सनी लिओनीने हे गाणे अपमानास्पद पद्धतीने सादर करून ब्रिजभूमीच्या प्रतिष्ठेला कलंक लावला आहे.

हिंदूंच्या भावना दुखावणारे गाणे

सनी लिओनचे ‘मधुबन में राधिका नाचे’ हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शेअर केले गेले आणि लवकरच ते वादात देखील सापडले. तेव्हापासून लोक सतत सनीला ट्रोल करत आहेत. ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या गाण्याच्या बोलांवर आक्षेप घेतला जात आहे. गाण्याच्या बोलानुसार सनीचा डान्स आक्षेपार्ह असल्याचं बोललं जात आहे. ‘राधा’ आमच्यासाठी पूजनीय आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे अनेकांनी म्हटले आहे. तेव्हापासून लोक या गाण्यावर बहिष्कार टाकत असल्याची चर्चा आहे.

जुन्या गाण्याचे रिक्रिएशन!

सनी लिओनीचे हे गाणे 1960मध्ये आलेल्या ‘कोहिनूर’ चित्रपटातील ‘मधुबन में राधिका नाचे’ या गाण्याचे रिक्रिएशन आहे. सनीचे हे गाणे कनिका कपूर आणि अरिंदम चक्रवर्ती यांनी गायले आहे आणि बॉलिवूड कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केले आहे.

हेही वाचा :

Happy Birthday Salman Khan | एका सुपरहिट चित्रपटानंतर तब्बल 6 महिने रिकामा बसून राहिला सलमान खान! वाचा नेमकं काय झालं?

Sunny Leone | ‘शाब्दिक’ वादानंतर सारेगामा बॅकफूटवर, अखेर सनी लिओनच्या ‘मधुबन’ गाण्यात बदल होणार!

ज्या वडिलांच्या उपचारासाठी स्पर्धेत सहभागी झाला, नियतीने त्यांनाच हिरावून नेलं! India’s Best Dancer फेम संकेतला पितृशोक

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.