Nusrat Jahan : तृणमूलची खासदार-अभिनेत्री नुसरत जहाँच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन, पुत्ररत्नाचा लाभ
नुसरतला बुधवारी कोलकात्यातील खासजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज तिनं एका मुलाला जन्म दिला आहे. नुसरतनं आज सकाळी हॉस्पिटलमधून एक फोटो शेअर केला होता. (Arrival of a new guest in TMC MP-Actress Nusrat Jahan life, gave birth to a baby boy)
मुंबई : बंगाली अभिनेत्री (Actress) आणि तृणमूल काँग्रेसची खासदार (TMC MP Nusrat Jahan) नुसरत जहाँ आता आई झाली आहे. नुसरतला बुधवारी कोलकात्यातील खासजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज तिनं एका मुलाला जन्म दिला आहे. नुसरतनं आज सकाळी हॉस्पिटलमधून एक फोटो शेअर केला होता.
पाहा नुसरत जहाँची पोस्ट
View this post on Instagram
नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर चर्चेत
नुसरत काही महिन्यांपूर्वी तिचं लग्न तुटल्यामुळे चर्चेत आली होती. कोलकाता येथील उद्योजक निखिल जैन याच्याशी तिचं लग्न वादात सापडलं तेव्हा तिनं आपलं हे लग्न अवैध असल्याचं सांगितलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून हे दोघं वेगळे राहत होते. नुसरतनं सांगितलं होतं की तिचं निखिलसोबतच लग्न अवैध आहे कारण ते तुर्की रीतीरिवाजांनुसार झालं होतं आणि भारतात विशेष विवाह कायद्यानुसार याला मान्यता नाही, त्यामुळे घटस्फोटाचं कारणच येत नाही.
पती निखिल जैननं केले अनेक आरोप
यानंतर निखिलनं नुसरतवर अनेक आरोपही केले होते, त्यानं म्हटलं होतं की नुसरतनं त्याच्याकडून खूप पैसे घेतले होते आणि नुसरतच्या पोटातील मूल हे त्याचं नाही. निखिल आणि नुसरत यांनी 2019 मध्ये तुर्कस्तानच्या बोडरम येथं धूमधडाक्यात लग्न केलं होतं.
संबंधित बातम्या
Monalisa : निळाशार समुद्र… वाळू… रणरणते उन आणि मोनालिसाचा बोल्डनेसचा तडका; फोटो पाहाच
Shama Sikandar : शमा सिकंदरची टोपीसोबत हॉट फोटो पोज, बोल्ड स्टाईलनं वाढला इंटरनेटचा पारा