आर्यन खान आणि अनन्या पांडेसोबत स्पाॅट, कॅमेरा दिसताच केले हे कृत्य
काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडेचा लाईगर हा चित्रपट रिलीज झाला.
मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या दोन वर्षांपासून सतत चर्चेत आहे. आर्यन खान त्याच्या आगामी चित्रपटावर काम करत असल्याचे बोलले जात आहे. तर चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे देखील काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडेचा लाईगर हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. साऊथमध्ये थोड्या फार प्रमाणात या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. मात्र, बाॅलिवूडच्या प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली होती.
लाईगर चित्रपटाच्या अपयशाचे खापर हे अनन्या पांडेवरच फोडण्यात आले. लाईगर चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर अनन्या पांडेला सतत चित्रपटांच्या आॅफर येत होत्या. मात्र, चित्रपट रिलीज झाल्यानंतर निर्मात्यांनी अनन्या पांडेकडेच पाठ फिरवली.
आर्यन खान देखील बाॅलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नेमक्या कोणत्या चित्रपटात आर्यन खान दिसणार हे कळू शकले नाहीये. अनन्या पांडेला करण जोहरने बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले होते.
नुकताच करण जोहरच्या पार्टीमध्ये जाताना आर्यन खान आणि अनन्या पांडेसोबत स्पाॅट झाले होते. मात्र, कॅमेराला (मीडिया) पाहून दोघेही तिथून फास्ट निघून गेले. यामुळे आता विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. यावेळी अनन्या पांडेचा लूक जबरदस्त दिसत होता.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल झाला होता. त्यामध्ये अनन्या पांडे आर्यन खानला बोलण्यासाठी थांबली होती. परंतू अनन्या पांडेला इंग्नोर करत आर्यन खान तेथून निघून गेल्याचे त्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत होते.
एका शोमध्ये बोलताना अनन्या पांडे म्हणाली होती की, आर्यन खानवर माझे क्रश होते. परंतू आता आम्ही फक्त चांगले मित्रच आहोत. करण जोहरच्या पार्टीमध्ये अनन्या आणि आर्यन खानसोबत आल्याने आता विविध चर्चांना उधाण आले आहे.