मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज खान या तिघांना जामीन मंजूर झाला आहे. न्यायमूर्ती नितीन सांबेर यांच्या खंडपीठानं जामीन अर्ज मंजूर केला. 20 ऑक्टोबर रोजी एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानने तातडीच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आर्यन खानची बाजू अॅड मुकूल रोहतगी (Mukul Rohatgi) मांडली.
सोलापूर –
सोलापुरात कोरोनाच्या वर्षात जिल्ह्यातील सहकारी बँकांमध्ये 871 कोटींच्या ठेवीची वाढ
मागील पाच वर्षात जिल्ह्यातील नागरी बँकांच्या ठेवीत तीन हजार वीस कोटी रुपयांची वाढ
कोरोनामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले असताना मागील वर्षभरात 871 कोटींनी ठेवींची भर
काही नागरी बँकात तर दररोज ठेवी वाढत असल्याचे चित्र
सोलापूर जिल्ह्यात लहान-मोठ्या तसेच शाखांचा विस्तार असलेल्या 34 नागरी बँक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील कॉर्डिलिया क्रुझवर छापा टाकत आर्यन खानसह आठ जणांना अटक केली होती. मुंबई हायकोर्टानं आर्यन खानला दिलासा दिला आहे. आर्यन खानला तब्बल 26 दिवसानंतर जामीन मिळाला आहे. आर्यन खानसाठी मुकुल रोहतगी यांनी केलेल्या युक्तिवादानंतर मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे.
कॉर्डिलिया ड्रग्ज क्रुझ प्रकरणी आज आर्यन खानसह तीन लोकांना हायकोर्टानं जामीन दिला. काल एनडीपीएस कोर्टाकडून जामीन देण्यात आला. एनसीबीकडून हे प्रकरण फर्जी बनवण्यात आलं. एनसीबी पहिल्या दिवसापासून युक्तिवाद बदलत होती. आज जामीन मिळाला आहे, हे प्रकरण फर्जी आहे. जे पुरावे आहेत ते न्यायालयाला देणार आहे. हे प्रकरण न्यायालयाकडून क्वॅश होईल, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.
ज्या अधिकाऱ्यांनं या मुलांना अटक केली तो भीतीपोटी मुंबई हायकोर्टात गेला आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून चौकशी करण्याऐवजी एनआयए किंवा सीबीआयकडून तपास करण्यात यावा, अशी मागणी हायकोर्टात करण्यासाठी तो अधिकारी गेला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सुरु केल्यानंतर एका आठवड्यात काय घडलं की एक अधिकारी ज्यांच्याकडे संरक्षण मागण्यासाठी गेला होता तो अधिकारी पोलिसाच्या कारवाईला घाबरत आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
न्यायमूर्तींनी प्रकरण ऐकून आम्हाला जामीन दिला आहे, असं वकीलांकडून सांगण्यात आलं आहे. कोर्टानं आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज खानला जामीन दिला आहे. आज हायकोर्टानं युक्तिवाद ऐकून तिघांना जामीन दिला आहे. उद्या कोर्टाती सविस्तर ऑर्डर मिळेल, असं वकिलांनी सांगितलं आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठासमोर तीन दिवस जामीनासाठी सुनावणी झाली. एनसीबीनं सेशन कोर्टात केलेला युक्तिवाद पुन्हा मुंबई हायकोर्टात केल्याचा दावा मुनमुन धामेचा यांच्या वकिलानं सांगितलं आहे.
मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे.
BREAKING : Bombay High Court allows bail to #AryanKhan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha in cruise drugs case. Court will pronounce detailed order with reasons tomorrow.#BombayHighCourt #NCB https://t.co/LgzP1Y4gwz
— Live Law (@LiveLawIndia) October 28, 2021
आर्यन खान जामीन अर्जावरील आजची कारवाई स्थगित
उद्या जामिनावर पुन्हा सुनावणी
मुकूल रोहतगी यांचा युक्तीवाद संपला, अॅड. अमित देसाई अरबाज मर्चंटच्यावतीने बाजू मांडत आहेत.
Senior Advocate Amit Desai now argues for Arbaaz Merchant.#AryanKhanCase #BombayHighCourt
— Live Law (@LiveLawIndia) October 26, 2021
आर्यन खान आणि अचित यांच्यात फक्त पोकर गेमबद्दल चर्चा झाली, असा दावा रोहतगी यांनी केला. तर ही चॅटिंग अॅ ड अमित देसाई न्यायालयासमोर सादर केली
आर्यन खानचा संबंध फारतर अरबाज मर्चंट तसेच अचित कुमार यांच्याशी जोडला जाऊ शकतो. पण यातील अचित कुमार हा क्रूझवर नव्हता. त्याला घरुन अटक करण्यात आलं. आर्यन तसेच अचित यांच्यात ऑनलाईन गेमिंगसंदर्भात चर्चा झाली. विशेष म्हणजे ही चॅटिंग 12 ते 14 महिन्यांपूर्वी झाली आहे. असा दावा रोहतगी आणि आणि अमित देसाई यांनी केला.
Senior Adv Amit Desai then interjects : Can I explain A17(Aachit)? He is also a young college kid. He was the person with whom A1(Aryan) was playing poker. And the chats were before 12- 14 months and that is being cited in the WhatsApp. #BombayHighCourt #AryanKhanCase
— Live Law (@LiveLawIndia) October 26, 2021
आर्यन खानने ड्रग्जचे सेवन केलेले नाही. तसेच तो बाळगलादेखील नाही. मग मागील 20 दिवसांपासून आर्यनला कारागृहात का ठेवण्यात आले आहे, असा सवाल मुकूल रोहतगी यांनी विचारला.
Rohatgi : . There is no consumption, no possession… Why this boy has been sent to 20 days in jail?#BombayHighCourt #AryanKhanCase #MukulRohatgi
— Live Law (@LiveLawIndia) October 26, 2021
ड्रग्ज पार्टीचा पंचनामा करण्यात आला. मात्र या पंचनाम्यात आर्यन खानचा मोबाईल जप्त केल्याचा उल्लेख नाही
Rohatgi- In this remand these is no seizure of the mobile phone. Mobile seizure is not even in the panchnama. #AryanKhan #BombayHighCourt #NDPS
— Live Law (@LiveLawIndia) October 26, 2021
मुकूल रोहतगी यांनी कोर्टात पंचनामा वाचून दाखवला. आर्यन खानवर NDPS च्या 8(c), 20b, 27 आणि कलम 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कलामंर्गत गुन्हा सिद्ध झाला तर कमाल 1 वर्षाची शिक्षा दिली जाते.
Rohatgi read the panchnama, now he is reading the remand.
He is booked under 8(c), 20b, 27 and section 35 of NDPS, the maximum punishment for which is 1years.#AryanKhan #BombayHighCourt #NDPS— Live Law (@LiveLawIndia) October 26, 2021
कोर्टाने रोहतगी यांना आर्यन खानच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅटिंगचा क्रूझ पार्टीशी काय संबंध आहे, असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना आर्यन खानची चॅटिंग ही सगळी क्रूझ पार्टीच्या आधीची असल्याचा दावा रोहतगी यांनी केला.
Court asks then what is the basis for the WhatsApp Chats.
Rohatgi- The Whatsapp Chats have nothing to do with the cruise case. They are all chats with people from before.#AryanKhanCase #MukulRohatgi #BombayHighCourt
— Live Law (@LiveLawIndia) October 26, 2021
आम्ही कोणताही राजकीय नेता तसेच पंच यांची बाजू घ्यायची नाही. तसेच त्यांची बाजू घेऊन हे माझे प्रकरण किचकट करायचे नाही. तसेच राजकीय व्यक्ती तसेच पंचांशी आर्यन खानचा कोणताही संबंध नाही, असा युक्तीवाद रोहतगी यांनी केला.
एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर आमचा कोणताही आरोप नाही. प्रभाकर साईल आणि के.पी गोसावी यांच्या साक्षीशी आर्यन खानचा कोणताही संबंध नाही, असे रोहतगी यांनी म्हणाले.
Rohatgi – I don’t accuse any officer of NCB. I am not concerned or connected with panch witness no. 1 or 2. (#PrabhakarSail or KP Gosavi).#AryanKhan #MukulRohatgi #BombayHighCourt #SameerWakhende
— Live Law (@LiveLawIndia) October 26, 2021
आर्यनची व्हॉट्सअॅप चॅटिंग बाहेर काढण्यात आली. ही चॅटिंग रेकॉर्डवर नाही. विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या चॅटिंगचा क्रूझ पार्टीशी संबंध नाही, असा दावा रोहतगी यांनी केलाय.
आर्यनविरोधात कट रचला जातोय. आर्यन अरबाजसोबत आला. आर्यनला अरबाजकडे असलेल्या गोष्टींची माहिती असल्याचा दावा केला जातोय. कोणाच्यातरी बुटामध्ये काय आहे, त्याच्याशी आर्यनचा काही संबंध नाही, असा दावा रोहतगी यांनी केला.
Rohatgi : My case is that there is no conscious possession at all. What somebody else had in their Shoe is not my concern. That cannot be my “conscious possession”.#AryanKhanCase #BombayHighCourt #MukulRohatgi
— Live Law (@LiveLawIndia) October 26, 2021
हे प्रकरण 2 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. आर्यन हा ग्राहक नव्हता. विशेष पाहुणा म्हणून त्याला आमंत्रित करण्यात आले होते. इव्हेंट मॅनेजर असलेल्या प्रतीक गाबा नावाच्या माणसाने त्याला बोलावलं होतं, असा दावा रोहतगी यांनी केलाय.
Rohatgi- The entire saga begins from Oct 2. A1 was not a customer, he was invited as a special guest. And invited by a man called Prateek Gaba, acting as an event manager. .#AryanKhanCase #BombayHighCourt
— Live Law (@LiveLawIndia) October 26, 2021
मुकूल रोहतगी आर्यन खानची बाजू मांडत आहेत. बाहेर असलेल्या गर्दीमुळे मी माफी मागतो. मी आर्यन खानची बाजू मांडत आहे. तो फक्त तेवीस वर्षाचा असून कॅलिफोर्निया येथून त्याने पदवीचे शिक्षण घेतले आहे. मार्च 2020 मध्ये तो परत भारतात आला आहे.
#MukulRohatgi– I am sorry for this commotion. May I proceed? I appear for A1. He is 23 years of age. Did his undergraduate in Calafornia and returned in March 2020. #AryanKhanCase
— Live Law (@LiveLawIndia) October 26, 2021
आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु
मुंबई हायकोर्टात जामीन अर्जावर सुनावणी
एनसीबीची बाजू मांडमारे एएसजी अनिल सिंग कोर्टात आले
ASG Anil Singh leading the NCB teams arrives in court.#AryanKhan #BombayHighCourt
— Live Law (@LiveLawIndia) October 26, 2021
मुंबई : न्यायालयात झालेल्या गर्दीवर न्यायाधीश सांबरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी गर्दी कमी करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या आवारातील गर्दी पांगवण्यासाठी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवण्याचे सांगितले आहे.
आर्यनने मुंबई हायकोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात असेही म्हटले आहे की, तो प्रभाकर साईलला ओळखत नाही किंवा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. अलीकडे जे आरोप-प्रत्यारोप होत आहेत, त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. आर्यन खानने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, हा एनसीबीचे अधिकारी आणि राजकीय लोकांमधील वाद आहे. मी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर कोणताही आरोप केलेला नाही.
पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा NCBने केला आहे. याच कारणामुळे हा जमीन नाकारला जाऊ शकतो. NCB चा आरोप आहे की शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांनी पंच साक्षीदारांवर प्रभाव टाकला आहे आणि Aryan Khan चा जामीन अर्ज केवळ याच आधारावर फेटाळला जाऊ शकतो.
NCB alleges that Shahrukh Khan’s manager Pooja Dadlani appears to have influenced panch witness and bail application of #AryanKhan is liable to be rejected on that ground alone.#BombayHighCourt #SameerWakhede pic.twitter.com/kHH9J1MqyQ
— Live Law (@LiveLawIndia) October 26, 2021
NCBने म्हटले आहे की, तपासात Aryan Khan चे आंतरराष्ट्रीय संबंध उघड झाले आहेत, जे प्रथमदर्शनी बेकायदेशीर ड्रग्ज खरेदीकडे सूचित करतात.
क्रूझ पार्टी ड्रग प्रकरणात अडकलेल्या आपला मुलगा आर्यन खान याला जामीन मिळवून देण्यासाठी चित्रपट अभिनेता शाहरुख खानने वकिलांची फौज उभी केली आहे. रिया चक्रवर्ती खटला लढलेले ज्येष्ठ वकील सतीश मानशिंदे यांनी प्रथम या खटल्याची बाजू मांडली. त्यानंतर हिट अँड रन प्रकरणात सलमान खानची निर्दोष मुक्तता करणारे अमित देसाईही आर्यनच्या बाजूने उभे राहिले. आता भारत सरकारचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी हे आर्यन खानच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या वतीने युक्तिवाद करणार आहेत. 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी मुकुल रोहतगी हे सुप्रीम कोर्टात राज्य सरकारचे वकील होते. शाहरुख खाननेही जामीन मिळवण्यासाठी करंजावाला अँड कंपनी या लॉ फर्मला मैदानात उतरवले आहे. वकिलांच्या या फौजेत रुबी सिंग आहुजा, संदीप कपूर, आनंदिनी फर्नांडिस आणि रुस्तम मुल्ला यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने आपला जबाब नोंदवला आहे. एनसीबीच्या जबाबानंतर आर्यनच्या वकिलानेही आपले उत्तर दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खानची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयात 57 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, आर्यनचा मित्र आणि ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अरबाज मर्चंट, अरबाज मर्चंटच्या जामीन अर्जाची यादी 64 व्या क्रमांकावर आहे.
मुंबई क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान आणि अभिनेत्री अनन्या यांच्यातील गप्पांमधून सातत्याने अनेक खुलासे होत आहेत. या प्रकरणाचा तपास करणार्या एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यन खानने 80 हजार रुपयांच्या ड्रग्जची ऑर्डर दिली होती. एका चॅटमध्ये आर्यन खान अचित कुमार नावाच्या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स विकत घेण्याबाबत बोलत आहे. आर्यनने एनसीबीचे नाव घेऊन चॅटमध्ये मित्रांनाही धमकावले होते. एका चॅटमध्ये आर्यन “उद्या कोकेन” असे वचन देताना दिसत आहे. आर्यन खान अचित कुमार नावाच्या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स विकत घेण्याबाबत बोलत आहे. आर्यन खानने अचित कुमारकडून सुमारे 80 हजार रुपयांचे ड्रग्ज मागवले होते. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यन खानच्या चॅटमधून हे खुलासे झाले आहेत.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आरोपी मुनमुन धमेचाचे वकील काशिफ खान देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात खटल्याच्या सुनावणीपूर्वी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आम्हाला आशा आहे की हे प्रकरण लवकरात लवकर निकाली निघेल.
Drugs-on-cruise case, Mumbai | Matter is kept for hearing & we are expecting that matter will be called out as early as possible…Less chances in first half, will be mentioning in 2nd half…definitely there is parity in listing: Munmun Dhamecha’s lawyer Kaashif Khan Deshmukh pic.twitter.com/oe6rUUeg8q
— ANI (@ANI) October 26, 2021
ट्रायल कोर्टातून जामीन न मिळाल्याने शाहरुख खानने मुलगा आर्यन खानला जामीन मिळवून देण्याची जबाबदारी माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यावर सोपवली आहे. उच्च न्यायालयात जामिनाच्या मुद्द्यावर युक्तिवाद करण्यासाठी रोहतगी हे करंजावाला अँड कंपनीसह मुंबईला गेले आहेत. आज होणाऱ्या सुनावणीदरम्यान ते आर्यन खानच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात हजर राहणार आहेत.
मुंबई क्रूझ शिप प्रकरणात समीर वानखेडेची आज (26 ऑक्टोबर) कोणतीही चौकशी होणार नाही. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची उद्या चौकशी केली जाईल.
Drugs on cruise ship case | I will appear for Aryan Khan in his bail matter today in Bombay High Court: Mukul Rohatgi, Former Attorney General of India
(file photo) pic.twitter.com/Ry4dhslTlz
— ANI (@ANI) October 26, 2021
आर्यन खानच्या वतीने जामीन प्रकरणात मी आज मुंबई उच्च न्यायालयात हजर राहीन, अशी माहिती भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी दिली