Aryan Khan Bail Plea Hearing : हायकोर्टासमोर पुन्हा एकदा पक्ष मांडणार NCB, शनिवारपर्यंत जामीन न मिळाल्यास आर्यनची दिवाळी तुरुंगातच!

मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज (28 ऑक्टोबर) म्हणजेच गुरुवारी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणीचा तिसरा दिवस आहे. आज दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार आहे.

Aryan Khan Bail Plea Hearing : हायकोर्टासमोर पुन्हा एकदा पक्ष मांडणार NCB, शनिवारपर्यंत जामीन न मिळाल्यास आर्यनची दिवाळी तुरुंगातच!
Aryan Khan
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 10:28 AM

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज (28 ऑक्टोबर) म्हणजेच गुरुवारी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणीचा तिसरा दिवस आहे. आज दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा युक्तिवाद बुधवारी पूर्ण झाला आहे. आता एनसीबी यावर आपली बाजू मांडणार आहे. एएसजी अनिल सिंग न्यायालयात एनसीबीची बाजू मांडणार आहेत. बुधवारी कोर्टात त्यांनी सांगितले की, आम्ही एका तासात संपूर्ण मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करू.

दुसरीकडे आर्यन खानला शनिवारपर्यंत जामीन न मिळाल्यास त्याला 17 नोव्हेंबरपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे. कारण यानंतर न्यायालय दिवाळीच्या सुट्टीवर जाणार आहे. या खटल्यात आर्यनची बाजू मांडताना त्याच्या वकिलाने सांगितले की, एनसीबीने आर्यन खान आणि इतर दोन आरोपी कटात सामील असल्याबद्दल बोलले आहे, परंतु या आरोपावर कधीही अधिकृतपणे पुरावा सादर केलेला नाही. न्यायमूर्ती एनडब्ल्यू सांबरे यांच्या न्यायालयात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामिनावर बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुनावणी होऊ शकली नाही.

अनिल सिंह मांडणार एनसीबीची बाजू

एनसीबीचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह गुरुवारी या प्रकरणी युक्तिवाद करणार आहेत. मुंबई किनार्‍याजवळील एका क्रूझवर एनसीबीच्या छाप्यात अंमली पदार्थ सापडल्याप्रकरणी 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आलेले आर्यन खान, मर्चंट आणि धमेचा हे 3 ऑक्टोबरपासून तुरुंगात आहेत. बुधवारी सुमारे दोन तास सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती सांबरे यांनी उद्या ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.

आर्यन खानची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला की, अटक वॉरंटमध्ये वास्तविक आणि योग्य कारणांचा उल्लेख नसल्यामुळे अटक घटनात्मक तरतुदींचे थेट उल्लंघन आहे. मर्चंटची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी मंगळवारी याच प्रकरणातील मनीष राजगढिया आणि अवीन साहू या दोन आरोपींना विशेष एनडीपीएस कोर्टाने दिलेल्या जामीनकडे लक्ष वेधले.

जामिनासाठी हा अर्ज दिला!

आपल्यावरील आरोपही सारखेच असल्याचे त्यांनी सांगितले. तर, त्यांच्यापैकी एकाकडून 2.6 ग्रॅम गांजा सापडला तर दुसऱ्याने तो सेवन केला होता. देसाई म्हणाले की, या मुलांना (आर्यन आणि मर्चंट) समानतेच्या आधारावर नाही, तर स्वातंत्र्याच्या आधारावर जामीन द्यावा. कठोर अटींच्या आधारे त्यांची जामिनावर सुटका करा.

त्यांनी न्यायालयाला सांगितले की, नंतर एनसीबीने कट रचणे आणि प्रवृत्त केल्याचा आरोप लावला आहे. देसाई म्हणाले की, त्यांना (आर्यन आणि मर्चंट) अटक करण्याऐवजी, NCB ने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम-41A (आरोपींना किरकोळ गुन्ह्यात जबाब नोंदवण्याची नोटीस) अंतर्गत नोटीस जारी करायला हवी होती.

अटक करण्याची गरज नव्हती

कटाचा आरोपही झालेला नसताना त्यांना अटक करण्याची गरज काय, असा सवाल देसाई यांनी केला. ते म्हणाले की, अमली पदार्थ कमी प्रमाणात जप्त करण्यासाठी केवळ एक वर्षाच्या कारावासाची तरतूद आहे. तो किरकोळ गुन्हा होता. NCB ने 3 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या अटक वॉरंटमध्ये फक्त NDPS कायद्याच्या कलम 20(b) आणि 27 मध्ये अंमली पदार्थांचे सेवन आणि बाळगण्यासंबंधीचा उल्लेख आहे. ते म्हणाले की, त्यात कलम-28 आणि 29 चा उल्लेख नाही ज्यामध्ये प्रवृत्त करणे आणि षड्यंत्र आहे.

देसाई म्हणाले की, एनसीबीने घटनास्थळावरून जप्त केलेल्या वस्तूंचे मूल्यांकन केले आहे. हे तिघे वेगवेगळे अंमली पदार्थांचे सेवन आणि बाळगण्याचे काम करत होते. त्या तारखेला तिघांवर अधिकृतपणे कट रचण्याचे कोणतेही आरोप दाखल करण्यात आले नव्हते. 3 ऑक्टोबर रोजी एनसीबीने त्याला ताब्यात घेण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांची दिशाभूल केली आणि कट रचल्याचा आरोपही त्यांनी केला.

whatsapp चॅटशी कनेक्शन नाही!

या प्रकरणातील दोन सहआरोपी, ज्यांना जामीन मिळालेला आहे, त्यांचा आर्यन खान आणि मर्चंटशी काही संबंध आहे का, असे उच्च न्यायालयाने विचारले असता, देसाई म्हणाले की, त्यांचा निश्चितच संबंध नाही. या तिन्ही आरोपींचे इतर आरोपींशी कोणतेही व्हॉट्सअॅप चॅट नसल्याचे त्यांनी सांगितले. एनसीबी ज्या व्हॉट्सअॅपवर अवलंबून आहे ते जुने आहे आणि या प्रकरणाशी संबंधित नाही.

या चॅट्सच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वकिलाने सांगितले की, आर्यन आणि इतरांच्या कथित व्हॉट्सअॅप चॅट्स मीडियाला उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, परंतु त्या कोर्टाच्या रेकॉर्डचा भाग नाहीत. न्यायमूर्ती सांबरे म्हणाले की, ब्रिटनने इलेक्ट्रॉनिक पुराव्याची पडताळणी करण्यासाठी प्रमाणपत्राची तरतूद काढून टाकली आहे, परंतु भारतात ते आवश्यक आहे. धमेचातर्फे वकील काशिफ अली खान देशमुख यांनी सांगितले की, आर्यन खान आणि मर्चंटसह त्यांना अटक करण्यात आल्याने त्यांच्या अशिलाला बळीचा बकरा बनवण्यात येत आहे.

धमेचा ड्रग्ज घेत नाही!

ते म्हणाले की, एनसीबीने धमेचाला कथित ड्रग नेटवर्कचा भाग बनवले आहे. पण ती या लोकांना (खान आणि मर्चंट) ओळखतही नाही. ती मध्य प्रदेशातील एका छोट्या शहरातील असून, ती एक फॅशन मॉडेल आहे. धमेचा यांनी कधीही अमली पदार्थाचे सेवन केले नसून, वैद्यकीय तपासणीतून याची पुष्टी होऊ शकते, असे ते म्हणाले. एनडीपीएस प्रकरणातील विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या तिघांनी गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हेही वाचा :

शाहरुख खानपासून ते रणबीर कपूरपर्यंत, ‘या’ बॉलिवूडकरांसाठी समीर वानखेडे ठरलेयत ‘दबंग’ अधिकारी!

डिजिटलच्या युगात सायकलवरून प्रोमोशन, ‘जयंती’साठी तरुणाचा मुंबई ते नागपूर सायकलवरून प्रवास!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.