Aryan Khan Drugs Case | शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी पुन्हा एकदा आर्यनच्या भेटीला
शाहरूखची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) ही सतत आर्यन खानची भेट घेत आहे. या सगळ्याप्रकरणात पूजा ददलानीने आर्यन खानला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. आजही (23 ऑक्टोबर) पूजा आर्यनच्या भेटीसाठी तुरुंगात पोहोचली होती. यावेळी तिने माध्यमांचे कॅमेरे टाळत थेट तुरुंग गाठले.
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचा आज पुन्हा जामीन फेटाळाल गेला. 13 दिवसानंतरही आर्यन खानला जामीन मिळालेला नाही. त्यामुळे शाहरुखची डोकेदुखी वाढली आहे. या सगळ्यात शाहरूखची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) ही सतत आर्यन खानची भेट घेत आहे. या सगळ्याप्रकरणात पूजा ददलानीने आर्यन खानला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. आजही (23 ऑक्टोबर) पूजा आर्यनच्या भेटीसाठी तुरुंगात पोहोचली होती. यावेळी तिने माध्यमांचे कॅमेरे टाळत थेट तुरुंग गाठले.
मुंबईच्या एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्याच्या वकिलांनी हाय कोर्टात धाव घेतली होती. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. मात्र, न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत आर्यन खान आणि इतरांच्या जामीन अर्जावर पुढील मंगळवारी सुनावणी करण्यात येईल, असा निर्णय देण्यात आला आहे. आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम मंगळवार पर्यंत वाढला आहे.
आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला
आर्यन खानच्या वतीनं अॅड.सतीश मानेशिंदे आणि अॅड. अमित देसाई यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्या अर्जावर आज सुनावणीला सुरुवात झाली. आर्यनच्या वतीनं मानेशिंदे यांनी न्यायालयात बाजू मांडण्यास सुरुवात केली, त्यांनी जामीन अर्जावर उद्या किंवा सोमवारी सुनावणी ठेवण्याची विनंती करत आमच्या अशिलाकडे कोणतही ड्रग्ज सापडलं नसल्याचा युक्तिवाद केला. एनसीबीचे वकिल अनिल सिंग यांनी जामीन अर्जाची प्रत मिळाली नसल्याचं सांगितलं. त्यावर न्यायालयानं मंगळवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं. आता मंगळवारी 26 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. मुनमुन धामेचा हिच्या जामीन अर्जावर देखील मंगळवारी सुनावणी होणार आहे. तर, शाहरुख खान आर्यन खानला भेटण्यासाठी पोहोचला होता.
आर्यन खानला न्यायालयाचा पुन्हा झटका
आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळून लावला आहे. आर्यनची अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीने त्याची कोठडी मागितली आहे. आर्यनचा संपूर्ण कटात समावेश असल्याता आरोप एनसीबीने केला आहे. त्यामुळे आर्थर रोड तुरुंगातील तिघांचा मुक्काम वाढला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली. गेल्या गुरुवारी न्यायालयात तिन्ही आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली होती. पण न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली. आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळून लावला आहे.