Aryan Khan Drug Case : कँटीनचं जेवण जेवून कोठडीत सायन्सची पुस्तकं वाचतोय आर्यन खान, वडिलांचा आवाज ऐकताच ढसाढसा रडला!

क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Arrest) याला अटक करण्यात आली आहे. आर्यनचीही मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यन खानला इतर आरोपींसह एनसीबी कार्यालयाजवळील राष्ट्रीय हिंदू रेस्टॉरंटमधून जेवण दिले जात आहे.

Aryan Khan Drug Case : कँटीनचं जेवण जेवून कोठडीत सायन्सची पुस्तकं वाचतोय आर्यन खान, वडिलांचा आवाज ऐकताच ढसाढसा रडला!
Aryan Khan
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 1:52 PM

मुंबई : क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Arrest) याला अटक करण्यात आली आहे. आर्यनचीही मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यन खानला इतर आरोपींसह एनसीबी कार्यालयाजवळील राष्ट्रीय हिंदू रेस्टॉरंटमधून जेवण दिले जात आहे. आर्यनच्या कुटुंबाकडून अन्न पुरवण्याची मागणी करण्यात आली होती, पण ती नाकारण्यात आली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान आणि गौरी देखील आर्यनला भेटायला आले होते. या दरम्यान, गौरीने आर्यनसाठी बर्गर आणला होता, पण एनसीबीने त्याला ते देऊ दिले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यनने एनसीबी लॉकअपमध्ये तपास संस्थेकडून काही विज्ञानाची पुस्तके मागितली होती, जी अधिकाऱ्यांनी त्याला दिली होती. आर्यनला त्याच रेस्टॉरंटमधून जेवण दिले जात आहे, जिथून बाकीच्या आरोपींसाठी जेवण येते. एनसीबीच्या ताब्यात सर्व आरोपींना एकत्र जेवण दिले जाते.

आर्यन खान ढसाढसा रडला

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशी दरम्यान कोठडीत कबूल केले आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने केवळ भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशांतही अंमली पदार्थांचे सेवन केले आहे. चौकशीत असे समोर आले आहे की अरबाज मर्चंट देखील आर्यनसोबत सतत ड्रग्ज घेत होता. चौकशीदरम्यान आर्यन सतत रडत असल्याचेही समोर आले आहे. एनसीबीने आर्यनला फोनवर शाहरुखशी बोलण्याचीही मुभा दिली होती. शाहरुख खान आणि गौरी खान यांना त्यांचा मुलगा ड्रग्स घेत असल्याची माहिती असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

NCB च्या मदतीला अन्य राज्यातील अधिकारी

एकीकडे मुंबई पोलिसांनी ड्रग्जप्रकरणाच्या केसमध्ये एण्ट्री घेतली असली तरी NCB नेही मोठी तयारी केली आहे. एनसीबीच्या मदतीसाठी अनेक राज्यातून एनसीबीचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. गुजरात , मध्य प्रदेश , दिल्ली येथून एनसीबी अधिकारी मुंबईत आले आहेत. मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रवासी जहाजावर मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात अनेक आरोपी आहेत. अनेकांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई झोनल ऑफिसमधील अधिकारी संख्येने कमी आहेत. याचमुळे इतर राज्यातून अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत.

आर्यनचा फोन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला!

आर्यनला क्रूझमधून ताब्यात घेतल्यानंतर लगेचच त्याचा मोबाईल फोनही अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना व्हॉट्सअॅप चॅट्सद्वारे ड्रग्जविषयी अनेक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आता अधिक माहिती मिळवण्यासाठी, आर्यन आणि इतर आरोपींचे मोबाईल फोन गांधी नगर येथील देशातील सर्वात मोठ्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. असा विश्वास आहे की, येत्या काही दिवसांमध्ये एनसीबी या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे खुलासे करू शकते.

आर्यनचे प्रकरण वरिष्ठ वकील सतीश मानशिंदे हाताळत आहेत. आर्यनला कोठडीतून वाचवण्यासाठी त्याने कोर्टात अनेक युक्तिवाद दिले, पण न्यायालयाने आर्यनला आणखी तीन दिवस कोठडीत पाठवले. एनसीबीच्या रिमांडमध्ये असे म्हटले होते की, आर्यन खानच्या फोनमध्ये छायाचित्रांच्या स्वरूपात धक्कादायक आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या आहेत. एनसीबीने 11 तारखेपर्यंत पुढील कोठडीची मागणी केली होती.

हेही वाचा :

Hum Do Hamare Do Teaser | पालकांनाच दत्तक घेण्याची हटके कथा, राजकुमार आणि क्रितीच्या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज

भाऊ आर्यनच्या अटकेनंतर शाहरुखच्या लेकीने घेतला मोठा निर्णय, ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल!

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.