Aryan Khan Release | ‘दिवाळीत खानांचे सिनेमे रिलीज होतात, या दिवाळीत खान स्वतः रिलीज झाले!’, आर्यनच्या सुटकेनंतर राम गोपाल वर्मांचे मिष्किल ट्वीट!
निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हा चित्रपट उद्योगातील सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटींपैकी एक आहे. राम गोपाल वर्मा हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आता पुन्हा एकदा रामू त्याच्या स्टाईलमध्ये परतले आहेत.
मुंबई : निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हा चित्रपट उद्योगातील सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटींपैकी एक आहे. राम गोपाल वर्मा हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आता पुन्हा एकदा रामू त्याच्या स्टाईलमध्ये परतले आहेत. बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Release) याची आज तुरुंगातून सुटका झाली आहे. आर्यन खान त्याच्या घरी मन्नतवर पोहोचला आहे. आर्यनच्या वापसीमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, राम गोपाल वर्मा यांनी एक मजेशीर ट्विट केले आहे.
आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे राम गोपाल वर्मा यांनी आर्यन खानची तुरुंगातून सुटकेची तुलना आगामी दिवाळी चित्रपटांशी केली आहे. रामूने ट्विट केले की, ‘बॉलिवुडमधील खानांच्या चित्रपटांच्या रिलीजसाठी राखीव असते. मात्र, यंदा दिवाळीत ‘खान’ स्वतः रिलीज झाले आहेत.’
पाहा राम गोपाल वर्मा यांचे ट्वीट
In Bollywood, Diwali has always been reserved for a Khans’s release.
This Diwali also Khan got released.
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) October 30, 2021
‘मन्नत’वर दिवाळी
आर्यन खानच्या घर वापसीनंतर शाहरुख खान आणि गौरी खानसह संपूर्ण कुटुंब आणि बॉलिवूडमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‘मन्नत’ रोषणाईने सजली असून, चाहत्यांनी ढोल वाजवून आर्यन खानचे स्वागत केले आहे. आर्यनला तुरुंगातून घरी आणण्यासाठी शाहरुख खानचा अंगरक्षक रवी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता.
सोशल मीडियावर ट्रेंड
आर्यन खान सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. चाहते आणि ट्विटर युजर्स आर्यन आणि शाहरुखचे अभिनंदन करत आहेत. यासोबतच आर्यन खानच्या स्वागतासाठी भावनिक आणि आनंदी ट्विटही केले जात आहेत. आर्यन खानला एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. 28 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने आर्यन खानला 14 अटींवर जामीन मंजूर केला होता.
काय आहेत ‘या’ 14 अटी?
- कोर्टाच्या म्हणण्यानुसार आर्यन खान आणि दोन सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना 1 लाख रुपयांचा वैयक्तिक बाँड जमा करावा लागेल. तसेच, किमान एक किंवा अधिक जामीनदार द्यावे लागतील.
- न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, आरोपीला अशा कोणत्याही प्रकरणात पुन्हा सहभागी होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागेल. ज्याच्या आधारावर त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्ह्यांची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- प्रकरणातील इतर आरोपी किंवा व्यक्तीशी संपर्क किंवा बोलणार नाही.
- आरोपीने असे कोणतेही कृत्य करु नये ज्यामुळे न्यायालयाच्या कारवाईवर किंवा आदेशांवर विपरित परिणाम होईल.
- आरोपीने प्रत्यक्षपणे किंवा कोणत्याही प्रकारे साक्षीदार आणि पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करु नये.
- सर्व आरोपींना विशेष न्यायालयात त्यांचे पासपोर्ट जमा करावे लागतील.
- या संदर्भात मीडिया किंवा सोशल मीडियावर कोणतेही वक्तव्य करु नये.
- NDPS न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडू शकत नाही.
- आरोपींना मुंबईबाहेर जाण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती तपास अधिकाऱ्यांना द्यावी लागेल.
- दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागेल.
- न्यायालयाने आदेशात असे म्हटले आहे की, आवश्यक कारण नसल्यास आरोपीला प्रत्येक सुनावणीच्या तारखेला न्यायालयात हजर राहावे लागेल.
- कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, एकदा खटला सुरु झाला तर आरोपी कोणत्याही प्रकारे खटल्याला विलंब करणार नाही.
- एनसीबी जेव्हा जेव्हा आरोपींना चौकशीसाठी बोलावेल तेव्हा त्यांना हजर राहावे लागेल. जर आरोपी कोणत्याही कारणाने तपासात सहभागी होऊ शकत नसेल तर त्यांना याबाबत तपास अधिकाऱ्यांना पूर्वीच माहिती द्यावी लागेल.
- आरोपीने यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास एनसीबीला त्याचा जामीन रद्द करण्यासाठी थेट विशेष न्यायालयात अर्ज करण्याचा अधिकार असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
हेही वाचा :
जुही चावलाच्या एका चुकीमुळे आर्यनची आजची रात्र तुरुंगात? खरं कारण समोर
क्रुझ ड्रग्जप्रकरणातील इतर सात जणांना जामीन मंजूर, आता सुटकेची प्रक्रिया सुरू