वडिलांसोबत काम करण्याच्या अनुभवावर आर्यन खान याने केला मोठा खुलासा, थेट म्हणाला…

शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा कायमच चर्चेत असतो. आर्यन खान याने काही दिवसांपूर्वीच एका जाहिरातीमध्ये आपल्या वडिलांसोबत काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच आर्यन खान याच्याबद्दल बोलताना पलक तिवारी हिने अत्यंत मोठा खुलासा केला होता.

वडिलांसोबत काम करण्याच्या अनुभवावर आर्यन खान याने केला मोठा खुलासा, थेट म्हणाला...
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 9:07 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे शाहरुख खान याने पठाण (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट फ्लाॅप गेला आणि शाहरुख खान हा पडद्यापासून दूर गेला. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत होते. शेवटी शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये (Bollywood) पुनरागमन केले. कोणीही विचार केला नसेल की शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल.

शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा चित्रपट ठरलाय. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवरील रेकार्ड तोडले आहेत. विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. या चित्रपटावर सतत बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. मात्र, या चित्रपटाने तूफान अशी कामगिरी केलीये.

शाहरुख खान याच्यासाठी हे वर्ष अत्यंत खास ठरले आहे. पठाण चित्रपटानंतर शाहरुख खान याने लगेचच त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरूवात केलीये. डंकी चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी शाहरुख खान हा काही दिवसांपूर्वीच कश्मीर येथे पोहचला होता. जवान चित्रपटाचे काही दिवसांपूर्वीच त्याने शूटिंग पूर्ण केले आहे.

एका जाहिरातीमध्ये शाहरुख खान आणि आर्यन खान यांनी सोबत काम केले आहे. नुकताच वडिलांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, यावर बोलताना आर्यन खान हा दिसला आहे. आर्यन खान म्हणाला की, वडिलांसोबत काम करणे माझ्यासाठी फार काही अवघड नक्कीच नव्हते. त्याचे कारणही तेवढेच मोठा आहे.

त्यांनी (शाहरुख खान) आपल्या अनुभवाने आणि समर्पणाने सेटवर प्रत्येकाचे काम सोपे केले. जेंव्हा ते सेटवर काम करतात, तेंव्हा सेटवरील प्रत्येक व्यक्तीला छान वाटते. पुढे आर्यन म्हणाला की, येणारे इनपूट ही सर्वांची मेहनत असते. त्यामुळे सेटवर सर्वांचे ऐकले पाहिजे. पहिल्यांदाच आर्यन खान हा आपल्या वडिलांसोबत काम करताना दिसला आहे. फक्त आर्यन खान हाच नाही तर शाहरुख खान याची मुलगी देखील याच वर्षी बाॅलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.