आर्यन खानला जामीन मिळताच गौरी खानला कोसळलं रडू, शाहरुख खानलाही अश्रू अनावर!
तब्बल तीन आठवड्यानंतर शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाला आहे. शाहरुख खान आणि गौरी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी झगडत होते.
मुंबई : तब्बल तीन आठवड्यानंतर शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाला आहे. शाहरुख खान आणि गौरी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी झगडत होते. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला. आज म्हणजेच शुक्रवारी (29 ऑक्टोबर) आर्यन खानची तुरुंगातून सुटका होणार असून, तीन आठवड्यांनंतर तो आपल्या पालकांना भेटणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, जामीन मिळाल्याची बातमी समजताच शाहरुख आणि गौरीला आपले अश्रू आवरता आले नाहीत, अशी बातमी समोर आली आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, शाहरुख खानला आर्यनला जामीन मिळाल्याची बातमी समजताच शाहरुखच्या चेहऱ्यावर शांतता पसरली. जणू त्यांना आता कसलीही पर्वा नव्हती. एवढेच नाही तर, आपल्या मुलाला जामीन मिळाल्याची बातमी समजताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
मुलाच्या जामिनाची बातमी ऐकून गौरी आणि शाहरुखच्या डोळ्यात पाणी!
आर्यन खानला जामीन मिळाल्याची बातमी शाहरुख खानच्या फिल्म इंडस्ट्रीतील मित्रांना कळताच सर्वांनी त्याला फोन करायला सुरुवात केली. अक्षय कुमार, सलमान खान आणि सुनील शेट्टी यांनी शाहरुख खानला फोन केले. शाहरुखशिवाय गौरी खानलाही कॉल येण्याचा सिलसिला सुरू झाला. मुलाच्या सुटकेबद्दल गौरीच्या जवळच्या मित्रांनी तिचे अभिनंदन केले. रिपोर्टमध्ये एका जवळच्या मित्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, आर्यन खानच्या जामिनाची बातमी ऐकून अक्षय कुमारपासून सलमान खानपर्यंत सर्वांनी शाहरुख खानला फोन केला.
त्याचवेळी गौरीला आधार देण्यासाठी महिप कपूर आणि सीमा खान यांनी फोन केला, तेव्हा ती धायमोकलून रडू लागली. सीमा आणि महीप गौरीच्या रोज फोनवरून संपर्कात असायचे. याशिवाय गौरीला आर्यन खानचा जामीन मिळाल्याचा मेसेज आला तेव्हाही ती ढसाढसा रडू लागली. डोळ्यातील अश्रू संभाळत गौरी गुडघ्यावर टेकून प्रार्थना करू लागली.
गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान दुसरीकडे कुठेतरी राहत होता, विशेषत: आर्यन खानच्या प्रकरणानंतर त्याचे चाहते मन्नतच्या बाहेर जमू लागले होते, असेही अहवालात सांगण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की, शाहरुखला कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी वाटत होती. हे टाळण्यासाठी त्यांनी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. आजकाल तो त्याची नेहमीची कार वापरत नाही. शाहरुख खान सध्या त्याच्या BMW ऐवजी Hyundai Creta ने सगळीकडे प्रवास करत आहे.