Ranveer Singh: 3 तास सुरू होतं रणवीरचं न्यूड फोटोशूट; फोटोग्राफरने सांगितला वादग्रस्त फोटोग्राफीमागचा किस्सा

या फोटोशूटची कल्पना कोणाची होती, त्यासाठी किती वेळ लागला, ते फोटोशूट कुठे आणि कसं करण्यात आलं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आशिषने 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

Ranveer Singh: 3 तास सुरू होतं रणवीरचं न्यूड फोटोशूट; फोटोग्राफरने सांगितला वादग्रस्त फोटोग्राफीमागचा किस्सा
Ranveer SinghImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 10:33 AM

‘पेपर’ या मासिकासाठी न्यूड फोटोशूट केल्यापासून अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) चांगलाच अडचणीत सापडला आहे. याप्रकरणी अनेकांनी रणवीरला ट्रोल केलं असून त्याच्याविरोधात गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून याच फोटोशूटची चर्चा आहे. फोटोग्राफर आशिष शाहने (Ashish Shah) रणवीरचे हे फोटो टिपले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने रणवीरच्या न्यूड फोटोग्राफीबद्दल (Nude Photoshoot) वक्तव्य केलं आहे. या फोटोशूटची कल्पना कोणाची होती, त्यासाठी किती वेळ लागला, ते फोटोशूट कुठे आणि कसं करण्यात आलं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आशिषने ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

ज्या फोटोशूटची एवढी चर्चा होत आहे ते करण्याची कल्पना कोणाची होती? तुमची की रणवीर सिंगची?

रणवीर सिंग आणि मी दोघांनी मिळून हा निर्णय घेतला होता. पेपर या मासिकाशी त्याची बऱ्याच वेळा चर्चा झाली होती. त्याने एकदा नकार दिला होता, मात्र अखेर तो फोटोशूट करण्यास तयार झाला. या फोटोशूटसाठी रणवीरला त्याच्या शरीरयष्टीवर विशेष मेहनत घ्यावी लागणार होती. तो एका विशिष्ट बॉडी शेपमध्ये दिसायला हवा होता आणि त्याला वेगळ्या पोश्चरमध्ये दाखवायचं होतं, त्यामुळे हे फोटोशूट करण्यास खूप वेळ लागला.

हे सुद्धा वाचा

हे शूट पूर्ण व्हायला किती वेळ लागला?

जवळपास तीन तासांत आम्ही हे फोटोशूट पूर्ण केलं.

हे फोटोशूट कुठे केलं होतं?

वांद्रे इथल्या मेहबूब स्टुडिओमध्ये आम्ही हे शूट केलं.

रणवीरने फोटोशूटसाठी त्याच्या डाएटमध्ये किंवा व्यायामात विशेष बदल केले होते का?

मला वाटत नाही की त्याला कोणत्याही मोठ्या शारीरिक बदलाची गरज आहे. कारण तो नेहमीच फिट असतो. पेपर या मासिकेसाठी किम कार्दशियननेही बोल्ड फोटोशूट केलं होतं. त्यावेळी मीसुद्धा त्यांच्यासोबत काम केलं होतं. मात्र या फोटोशूटदरम्यान रणवीरसोबतची ही माझी पहिली भेट होती.

रणवीरसोबत पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव कसा होता?

भेट होताच आम्ही खूप चांगले मित्र झालो. रणवीरने खूप चांगलं काम केलं. त्याला माझ्या कामाच्या पद्धतीची माहिती होती. खरं सांगायचं झालं तर एकमेकांवर विश्वास असल्याशिवाय मला सेलिब्रिटी शूट करायला आवडत नाही.

या फोटोशूटवरून बराच गदारोळ झाला आहे. त्यावर तुझं काय मत आहे?

आपण प्रत्येक गोष्टीवर आपलं मत मांडू शकतो. रणवीर त्याच्या बॉडीबाबत खूपच कम्फर्टेबल होता. रणवीरसारख्या अष्टपैलू अभिनेत्याने मला हवं तसं फोटोशूट करण्याची परवानगी दिली हे पुरेसं होतं. हे अनेकदा सेलिब्रिटींसोबत घडताना दिसतं. जेव्हा तुम्ही त्यांच्या आजूबाजूला असता तेव्हा तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने त्यांच्यासोबत वागावं लागतं. पण रणवीरच्या बाबतीत तसं झालं नाही. त्याच्या चित्रपटांबद्दल आणि दिग्दर्शकांशी एकत्र काम करण्याबद्दल आम्ही खूप बोललो. त्याच्या फोटोशूटवरून होणारा हा गोंधळ विनाकारण आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.