मुंबई : शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाची हवा सध्या बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळतंय. विशेष म्हणजे पठाण चित्रपटामध्ये किंग खान अर्थातच शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्यासोबत सलमान खान देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. सलमान खान याचा केमिओ चित्रपटामध्ये आहे. यामध्ये शाहरुख खान याला वाचवताना सलमान खान (Salman Khan) हा दिसत आहे. सलमान खान आणि शाहरुख खान यांना सोबत पाहून चाहत्यांना मोठा आनंद झालाय. सलमान खान याचा देखील किसी का भाई किसी की जान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमान खान याच्यासोबत बिग बाॅस फेम शहनाज गिल देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये शहनाज गिल हिला काम करण्याची संधी देखील सलमान खान याने दिली आहे. सध्या बाॅक्स आॅफिसवर शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट धमाकेदार कमाई करतोय. तीन दिवसांमध्ये पठाण चित्रपटाने जगभरातून जवळपास ३०० कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे.
मुळात म्हणजे पठाण चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासोबतच सलमान खान याची झलक पाहण्यास भेटणार असल्याने चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह नक्कीच होता.
सुरूवातीला पठाण चित्रपटाच्या विरोधात वातावरण बघायला मिळत होते. परंतू चित्रपट रिलीज झाल्यानंतर सर्व चित्रच बदलून गेले. चाहते या चित्रपटावर प्रचंड प्रेम करत आहेत.
शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारीला रिलीज झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाका करत थेट ५४ कोटींचे कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी ६८ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३७ कोटीचे कलेक्शन करत अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर नोंदवले.
Salman bhai is…woh kya kehte hain aaj kal…young log…haan….GOAT. ( greatest of all time ) #Pathaan https://t.co/91HJy8UZxU
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 28, 2023
शनिवार आणि रविवार चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. २६ जानेवारीच्या सुट्टीचा फायदा देखील चित्रपटाला झाल्याचे बाॅक्स आॅफिस कलेक्शनवरून दिसत आहे.
शनिवारी शाहरुख खान याने Ask SRK सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी एका युजर्सने लिहिले की, सर, पठाण हा चित्रपट हीट झाला आहे, परंतू बॉक्स ऑफिसवर सलमान खान याच्याशी तुम्ही टक्कर देऊ शकणार नाहीत.
यावर शाहरुख खान याने अत्यंत खास उत्तर देत लिहिले की, सलमान भाई आहे… ते आजकाल म्हणतात ना.. GOAT (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) शाहरुख खान हा Ask SRK सेशनमध्ये आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देतो.