‘ती वाचेल असं वाटलं नव्हतं…’, आर्यनच्या जन्मावेळी गौरीची अवस्था बघून घाबरला होता शाहरुख खान!
अभिनेता शाहरुख खानला (Shah Rukh Khan) बॉलिवूडचा ‘रोमान्स किंग’ म्हटले जाते. त्याने पडद्यावर एकापेक्षा एक सुंदर नायिकांशी रोमान्स केला आहे. पण, वास्तविक जीवनात तो फक्त त्याची पत्नी गौरीसाठी वेडा आहे. गौरी आणि शाहरुखची प्रेमकथाही खूप सुंदर आहे.
मुंबई : अभिनेता शाहरुख खानला (Shah Rukh Khan) बॉलिवूडचा ‘रोमान्स किंग’ म्हटले जाते. त्याने पडद्यावर एकापेक्षा एक सुंदर नायिकांशी रोमान्स केला आहे. पण, वास्तविक जीवनात तो फक्त त्याची पत्नी गौरीसाठी वेडा आहे. गौरी आणि शाहरुखची प्रेमकथाही खूप सुंदर आहे. एका पार्टीत गौरीला पाहून शाहरुख पहिल्या नजरेतच तिला आपले हृदय देऊन बसला. त्याचबरोबर गौरी देखील शाहरुखचं उत्कट प्रेम पाहून त्याच्या प्रेमात पडली.
गौरीने शाहरुखचा हात धरला, जेव्हा तो अजिबात नावाजलेला नव्हता आणि जेव्हा शाहरुखकडे जगातील सगळी सुखं होती, तेव्हाही गौरीही त्याच्यासोबत होती. मात्र, एक वेळ अशी आली जेव्हा शाहरुखला वाटले की, गौरी आता जिवंत राहणार नाही. खरं तर, जेव्हा शाहरुख आणि गौरीचा मुलगा आर्यनचा जन्म होत होता, तेव्हा गौरी अशा अवस्थेत होती की, शाहरुख घाबरला आणि त्याला वाटले की गौरी कदाचित जिवंत राहणार नाही.
रुग्णालयाच्या नावानेही वाटते भीती!
शाहरुखने एका मुलाखतीत स्वतः याचा खुलासा केला होता. वास्तविक, जेव्हा शाहरुख 15 वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले, तर काही वर्षांनी त्याच्या आईचेही निधन झाले. दोघांचाही मृत्यू रुग्णालयात झाला आणि शाहरुखसाठी हा धक्का खूप मोठा होता. शाहरुख आजपर्यंत हे दु:ख विसरू शकलेला नाही, त्यामुळे हॉस्पिटलच्या नावाने तो आजही खूप घाबरतो.
गौरी बरी व्हावी हीच इच्छा!
जेव्हा, गौरीला प्रसूती वेदना होऊ लागल्या, तेव्हा तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले होते. गौरी वेदनेने अक्षरशः ओरडत होती आणि शाहरुख तिला पाहून खूप घाबरला होता. शाहरुखने गौरीला आजारी पडताना किंवा रुग्णालयात जाताना कधीच पाहिले नव्हते, म्हणून जेव्हा त्याने गौरीला वेदनेने त्रासलेले पाहिले, तेव्हा शाहरुखचे हात पाय गळून गेले होते. त्या वेळी, त्याला आपल्या भावी मुलाचीही चिंता नव्हती, त्याला फक्त एवढेच हवे होते की, गौरी कशी तरी लवकर बरी होईल.
आर्यनच्या जन्माचा आनंद
शाहरुखने मुलाखतीत सांगितले होते की, ‘ती खूप थरथरत होती आणि मला माहित आहे की, मुलांना जन्म देताना स्त्रियांना मृत्यू येत नाही. पण, काही जुन्या आठवणींनी माझ्यामध्ये भीती जिवंत केली. तथापि, नंतर सर्व ठीक झाले, आर्यनचा जन्म झाला.’ शाहरुखने सांगितले होते की, त्याला आपले पहिले मूल मुलगी असावी, असे वाटत होते, पण नंतर तो आर्यनच्या जन्मावरही आनंदी होता.
ड्रग्ज केसमध्ये आर्यनला अटक
अलीकडेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलाचे नाव मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या जहाजात चाललेल्या रेव्ह पार्टीमध्ये आले आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन यालाही एनसीबीच्या छाप्यादरम्यान ताब्यात घेण्यात आले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारीही त्याची चौकशी करत आहेत. यामध्ये 13 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यात दिल्लीतील तीन महिलांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणात सर्व आरोपींची 11 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी एनसीबीच्या वकिलांकडून करण्यात आली होती. मात्र कोर्टाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांनाही 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे अजून तीन दिवस आर्यन खानचा मुक्काम कोठडीत असेल हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणीपर्यंत एनसीबीला काय माहिती मिळते त्यावर पुढील गोष्टी अवलंबून असणार आहे. तोपर्यंत शाहरुख खानला वाट पाहण्याशिवाय काही करता येणार नाही.
हेही वाचा :
शाहरुख खानच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, आर्यन खान…