Atrangi Re | सारा-धनुष-अक्षयचा ‘अतरंगी’ अंदाज, ‘अंतरंगी रे’चे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!

‘अतरंगी रे’ची घोषणा झाली, तेव्हापासून अक्षयला एका नव्या रुपात पाहायला मिळेल, म्हणून प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. सारा अली खान आणि धनुष यांच्या एकत्र एंट्रीने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली होती आणि आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. ‘अतरंगी रे’च्या रिलीजची तारीख देखील निश्चित झाली आहे.

Atrangi Re | सारा-धनुष-अक्षयचा ‘अतरंगी’ अंदाज, ‘अंतरंगी रे’चे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!
Atrangi Re
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 11:13 AM

मुंबई : बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि धनुष (Dhanush) स्टारर ‘अतरंगी रे’चा (Atrangi Re) फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी (24 नोव्हेंबर) प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले, ‘एक लडकी प्यार में पागल… मिलीये अतरंगी नंबर 1 रिंकू से मिले’. ‘अतरंगी रे’चे 3 टीझर पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. या तीन टीझर पोस्टरमध्ये चित्रपटातील तिन्ही प्रमुख व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आल्या आहेत.

या चित्रपटात सारा अली खानचे नाव रिंकू असणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात धनुष विशूच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. ‘अतरंगी रे’ OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर रिलीज होणार आहे.

पाहा पोस्टर :

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या चित्रपटात अक्षय आणि सारा पहिल्यांदाच आनंद एल राय यांच्यासोबत काम करत आहेत. त्याचवेळी धनुषने आनंदच्या ‘रांझना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या टीझर पोस्टरवर प्रेक्षक सतत प्रतिक्रिया देत आहेत, यावरून प्रत्येकजण चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत असल्याचे स्पष्ट होतेय.

‘अतरंगी रे’ची घोषणा झाली, तेव्हापासून अक्षयला एका नव्या रुपात पाहायला मिळेल, म्हणून प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. सारा अली खान आणि धनुष यांच्या एकत्र एंट्रीने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली होती आणि आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. ‘अतरंगी रे’च्या रिलीजची तारीख देखील निश्चित झाली आहे.

‘या’ दिवशी होणार रिलीज

‘अतरंगी रे’ 24 डिसेंबरला प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘बेलबॉटम’ आणि ‘सूर्यवंशी’नंतर अक्षयचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे, जो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच बरोबर OTT वर प्रदर्शित होणारा अक्षयचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी 2020 मध्ये ‘लक्ष्मी’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता. अक्षयने चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करून रिलीज डेटची घोषणा केली.

अक्षय, सारा आणि धनुष पोस्टरवर आपापल्या पात्रांचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्याचवेळी, दुसऱ्या पोस्टरवर धनुष आणि साराच्या पात्रांचे लग्नानंतरचे फोटो दिसत आहेत. यात धनुष हसतोय आणि सारा चक्क झोप काढत आहे.

हेही वाचा :

Ratris Khel Chale 3 | ‘रात्रीस खेळ चाले 3’मध्ये ‘शेवंता’ बदलणार! अपूर्व नेमळेकरने मालिकेतून घेतली एक्झिट!

निलेश साबळेंनी मागितली नारायण राणेंची माफी, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात नेमकं काय घडलं ?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.