Brahmastra | रणबीर-आलियाला महाकालेश्वरच्या दर्शनापासून रोखल्यानंतर अयान मुखर्जी म्हणाले की…
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप ठरत असल्याने कलाकारांमध्ये एक चिंतेचे वातावरण बघायला मिळते आहे. बाॅलिवूडमधील स्टार असलेले अक्षय कुमार आणि आमिर खान यांचेही चित्रपट फेल केले.
मुंबई : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाला रिलीज होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. चाहतेही हा चित्रपट बघण्यासाठी उत्सुक दिसतायेत. मात्र, रणबीरचे बीफ खाण्याचे वक्तव्य चित्रपटाला भोवण्याची शक्यता आहे. आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरला उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेण्यास जाण्यापासून रोखण्यात आले. आता यासर्व प्रकरणी ब्रह्मास्त्र चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) यांनी प्रतिक्रिया दिलीयं. विशेष म्हणजे यावर रणबीरची पाठराखण करत अयान मुखर्जीने बाजूही घेतलीयं.
मंदिरात जाण्यापासून रोखल्यानंतर अयान मुखर्जी म्हणाले की…
अयान मुखर्जी म्हणाले की, महाकालेश्वर मंदिरात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट येऊ शकले नसल्याने मला खूप वाईट वाटले. मिळालेल्या माहितीनुसार रणबीर कपूर आणि आलिया भट्टला मंदिरात जाण्यापासून रोखण्यासाठी काही हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते जमले होते. यामुळे रणबीर आणि आलिया महाकालेश्वरचे दर्शन घेऊ शकले नाहीयंत, मला खरोखरच वाईट वाटलं. बीफ खाण्याच्या वक्तव्यामुळे रणबीर आणि आलियाला मंदिरात जाण्यापासून मंगळवारी रोखण्यात आले होते.
रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप ठरत असल्याने कलाकारांमध्ये एक चिंतेचे वातावरण बघायला मिळतेय. बाॅलिवूडमधील स्टार असलेले अक्षय कुमार आणि आमिर खान यांचेही चित्रपट फेल केले. त्यामध्येच आता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ब्रह्मास्त्र चित्रपट काय कमाल करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. हा चित्रपट उद्या रिलीज होतोयं. ब्रह्मास्त्र चित्रपटात आलिया रणबीरशिवाय मौनी रॉय, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन हे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नागार्जुनमुळे बाॅक्स आॅफिसवर चित्रपट चांगली कमाई करेल असे सांगितले जातंय.