‘ब्रह्मास्त्र’मध्ये आलियाच्या वाटेला छोटी भूमिका का? चाहत्यांच्या प्रश्नावर अयानने दिलं ‘हे’ उत्तर

चित्रपट पाहिल्यानंतर ट्विटरवर अनेकांनी त्यातील आलियाच्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित केला. एवढी दमदार अभिनेत्री असूनही आलियाला चित्रपटात फारसा वाव मिळाला नाही, अशी तक्रार नेटकऱ्यांनी केली.

'ब्रह्मास्त्र'मध्ये आलियाच्या वाटेला छोटी भूमिका का? चाहत्यांच्या प्रश्नावर अयानने दिलं 'हे' उत्तर
Ayan and AliaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 3:17 PM

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर ट्विटरवर अनेकांनी त्यातील आलियाच्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित केला. एवढी दमदार अभिनेत्री असूनही आलियाला चित्रपटात फारसा वाव मिळाला नाही, अशी तक्रार नेटकऱ्यांनी केली. त्यावर आता दिग्दर्शक अयान मुखर्जीने (Ayan Mukerji) प्रतिक्रिया दिली आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत अयान म्हणाला, “आलियाला याआधी गंगुबाई आणि इतर चित्रपटांमध्ये तशा भूमिका करताना पाहिल्यानंतर ठराविक प्रेक्षकांची ही तक्रार असू शकते. मी असंही ऐकलंय की काही लोक वरवरचं म्हणाले की, आलिया चित्रपटात खूपच सुंदर दिसत आहे. आनंदी, हसतखेळत राहणारी व्यक्ती साकारण्याची अशी संधी आलिया याआधी मिळाली नव्हती. जरी ती भूमिका अत्यंत साधी वाटत असली तरी ती तेवढीच महत्त्वाची आहे.”

हे सुद्धा वाचा

“हा चित्रपट देशभरात पाहिला जावा याची मी वाट पाहत आहे. तिच्या सकारात्मक भूमिकेचा स्वीकार केला जाईल असं मला अजूनही वाटतं. पण हा मुद्दा मी लक्षात ठेवीन. दुसऱ्या भागात आम्ही तिच्या भूमिकेला आणखी न्याय देण्याचा प्रयत्न करू”, असं तो पुढे म्हणाला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अयान बॉयकॉट ट्रेंडविषयीही व्यक्त झाला. “लोक काय म्हणतायत याची आम्हाला काळजी होती. पण त्याचसोबत आम्ही त्या गोष्टींचा स्वीकारसुद्धा केला. आम्ही आमच्या चित्रपटावर, त्यातील विषयावर इतकं लक्ष केंद्रीत करून होतो, की त्या गोष्टींबद्दल विचार करण्यासाठी आम्हाला वेळच मिळाला नाही”, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

ब्रह्मास्त्रने पहिल्याच वीकेंडमध्ये जगभरात 225 कोटींची कमाई केली. तर भारतात या चित्रपटाने 150 कोटींचा गल्ला जमवला आहे. यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या भूमिका आहेत. त्याचसोबत शाहरुख खान यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.