लग्नानंतरही आई बनू शकली नाही आयेशा जुल्का, आपल्या ‘त्या’ निर्णयाविषयी सांगताना अभिनेत्री म्हणते…

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आयशा जुल्का (Ayesha Jhulka) हिला आजमितीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. आयशाचा जन्म 28 जुलै 1972 रोजी श्रीनगर येथे झाला होता.

लग्नानंतरही आई बनू शकली नाही आयेशा जुल्का, आपल्या ‘त्या’ निर्णयाविषयी सांगताना अभिनेत्री म्हणते...
आयेशा जुल्का
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 9:42 AM

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आयशा जुल्का (Ayesha Jhulka) हिला आजमितीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. आयशाचा जन्म 28 जुलै 1972 रोजी श्रीनगर येथे झाला होता. 90च्या दशकात तिने आपल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांद्वारे प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा निर्माण केली होती, त्याबरोबर अभिनेत्रीच्या सुंदर हास्याने सर्वांचे मन जिंकले. पण अभिनेत्रीनी काहीच चित्रपटांनंतरच लग्नगाठ बांधली आणि पुन्हा कधीही बॉलिवूडकडे वळून पाहिले नाही. या अभिनेत्रीने 2003मध्ये एका प्रसिद्ध व्यावसायिकाबरोबर लग्न केले होते, पण त्यांना कधीही मुले झाली नाहीत. याचा खुलासा आता स्वतः अभिनेत्रीने केला आहे.

आयशाने 2003 मध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक समीर वशीशी लग्न केले. त्यानंतर तिने बॉलिवूड विश्वाचा निरोप घेतला आणि त्यानंतर अभिनेत्रीने लाईमलाइटपासून अंतर राखले. अभिनेत्री गेल्या 18 वर्षांपासून तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. पण अभिनेत्रीने कधीच मुलांना जन्म दिला नाही. एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्रीने सांगितले होते की, तिला कधीही मुले नको होती. अभिनेत्री म्हणाली, “मला मुले नाहीत, कारण मलाच ती नको होती. माला माझ्या कामात आणि समाजाच्या सेवेमध्ये बराच वेळ आणि शक्ती खर्च करायची होती, ज्यामुळे मला कधीच मूल झाले नाही.’

मलाच असे राहायचे होते!

आयशा पुढे म्हणाली, “माझा निर्णय संपूर्ण कुटुंबासाठी चांगला असावा अशी माझी इच्छा होती. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते, की मला समीरसारखा नवरा मिळाला आहे. मला स्वत:हून जसे राहण्याची इच्छा होती, तसेच मला समीरने राहू दिले,  त्याने नेहमीच माझ्या निर्णयाचा आदर केला.”

तिच्या सिनेमात आयशाची स्टाईल प्रेक्षकांना खूप आवडली होती. इतकेच नाही, तर अभिनेत्रीचा “जो जीता वही सिकंदर” हा चित्रपट कोणालाही विसरता येणार नाही. या चित्रपटात तिची शैली चित्रपटात खूप खास होती, यामुळे तिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी स्थिरावला आहे. अलिकडे आयशा ‘जीनियस’ या चित्रपटात झळकली होती, तिने या चित्रपटात एका आईची भूमिका साकारली होती.

चित्रपट विश्वापासून का गेली दूर?

आपल्या एका मुलाखतीत आयशा जुल्काने चित्रपट विश्वापासून दूर जाण्याचे कारण सांगितले होते. आयशाने म्हटले होते की, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अशी वेळ येते, जेव्हा त्याला आपल्या जीवनाचा नेमका हेतू कळतो. मला आयुष्यात सेटल व्हायचे होते आणि त्या काळात मला शूटिंगसाठी बर्‍याच शिफ्टमध्ये काम करावे लागत होते. मी माझे वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन एकत्रितपणे व्यवस्थापित करू शकले नाही, यामुळे मी अभिनयापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

(Ayesha Jhulka could not become a mother actress talks about her decision)

हेही वाचा :

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीवर प्रश्नचिन्ह, ‘हंगामा 2’चे निर्माते म्हणतात…

संजय दत्तच्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राईज, पाहा KGF 2च्या ‘Adheera’चा खतरनाक लूक!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.