Doctor G | चला तिकीट आताच बुक करून ठेवा! आयुष्मान खुराना-रकुल प्रीतचा ‘डॉक्टर जी’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताच पुन्हा एकदा मनोरंजनाची मेजवानी सुरु झाली आहे. अनेक बहुप्रतीक्षित चित्रपटांनी आपल्या चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या यादीतच आता अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) यांचा ‘डॉक्टर जी’ (Doctor G) हा चित्रपट देखील सामील झाला आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताच पुन्हा एकदा मनोरंजनाची मेजवानी सुरु झाली आहे. अनेक बहुप्रतीक्षित चित्रपटांनी आपल्या चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या यादीतच आता अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) यांचा ‘डॉक्टर जी’ (Doctor G) हा चित्रपट देखील सामील झाला आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या नव्या वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जंगली पिक्चर्स प्रोडक्शनचा चित्रपट असून, त्यामध्ये आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana), रकुल प्रीत सिंह आणि शेफाली शाह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 17 जून 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
पाहा आयुष्मानची पोस्ट :
Get ready to book your appointment in cinemas on 17th June 2022 as @Rakulpreet @ShefaliShah_ and I come together for #DoctorG.#SheebaChaddha #AbhayChintamaniMishr @anubhuti_k #SumitSaxena @Saurabhbharat @VishalWagh21 @JungleePictures pic.twitter.com/TYLIUFpNMA
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) November 1, 2021
पुन्हा एकदा धमाल करण्याची संधी!
‘डॉक्टर जी’मध्ये डॉ. उदय गुप्ताची व्यक्तिरेखा साकारत असलेल्या अभिनेता आयुष्मान या चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत उत्सुकता व्यक्त केली होती. तो म्हणाला की, ‘डॉक्टर जी’चा विषय माझ्या खूप जवळचा आहे. लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करत, आम्ही सर्वजण चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्याची वाट बघत होतो, आणि आम्हाला याचा आनंद आहे की, अखेरीस तो दिवस उगवला आणि वेळेत या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.’
आयुष्यमान पुढे म्हणाला की, ‘स्क्रीनवर पहिल्यांदाच एका डॉक्टरची व्यक्तिरेखा साकारणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी यासाठी खरोखरच खूप उत्साहित आहे. कारण यामुळे मला पुन्हा एकदा विद्यार्थी होण्याची आणि हॉस्टेल लाईफ जगण्याची आणि त्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळाली आहे.’
रकुल प्रीत सिंहनं व्यक्त केल्या भावना
आपल्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना रकुल म्हणाली की, ‘डॉक्टर जीचे चित्रीकरण हा एक सुंदर अनुभव राहिला आहे. यामध्ये मी एका डॉक्टरची भूमिका साकारत असल्यामुळे, यातील व्यवहार आणि काम परफेक्ट असणे आवश्यक होते. स्क्रीनवर वास्तविक दिसण्यासाठी मेडिकलशी निगडित मुख्य गोष्टी जाणून घेणे अनिवार्य होते. डॉक्टर फातिमा बनण्याचा प्रवास ही एक अद्भुत प्रक्रिया होती जी मी नेहमीच माझ्याजवळ जपून ठेवू इच्छिते.’
‘डॉक्टर जी’ एक कॅम्पस कॉमेडी ड्रामा
‘बरेली की बर्फी’ आणि ‘बधाई हो’ सारख्या दोन यशस्वी चित्रपटांनंतर ‘डॉक्टर जी’ हा जंगली पिक्चर्ससोबत आयुष्मानचा तिसरा चित्रपट आहे. आयुष्मान आणि रकुल पहिल्यांदाच ‘डॉक्टर जी’च्या निमित्ताने एकत्र येत आहेत. अनुभूति कश्यप दिग्दर्शित, ‘डॉक्टर जी’ एक कॅम्पस कॉमेडी ड्रामा असणार आहे, ज्याचे सह-लेखक सुमित सक्सेना, विशाल वाघ आणि सौरभ भारत आहेत. निर्मात्यांनी नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर जाहीर केली आहे.