Baby Vamika | विरुष्काची लेक वामिका झाली 6 महिन्यांची! पार्कात झालं सेलिब्रेशन, अनुष्काने शेअर केले खास फोटो!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा नवरा क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) सध्या आपल्या लेकीसाठी एक उत्तम पालक बनण्यात व्यस्त आहेत. ही लोकप्रिय जोडी सतत त्यांच्या पालकत्वाचा आनंद घेताना दिसते.

Baby Vamika | विरुष्काची लेक वामिका झाली 6 महिन्यांची! पार्कात झालं सेलिब्रेशन, अनुष्काने शेअर केले खास फोटो!
वामिका
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 10:23 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा नवरा क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) सध्या आपल्या लेकीसाठी एक उत्तम पालक बनण्यात व्यस्त आहेत. ही लोकप्रिय जोडी सतत त्यांच्या पालकत्वाचा आनंद घेताना दिसते. नुकतीच विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये हे कपल आपल्या मुलीसोबत फन मूडमध्ये दिसत आहे. अनुष्का शर्माने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत असताना अभिनेत्रीने सांगितले की, आता तिच्या आणि विराटच्या आयुष्यात वामिकाला (Vamika) येऊन 6 महिने पूर्ण झाले आहेत. अर्थात वामिका आता 6 महिन्यांची झाली आहे.

या फोटोंमध्ये अनुष्का शर्मा, वामिका आणि विराट हे तिघेही आपल्याला एकत्र धमाल करताना पाहायला मिळले आहेत. एका फोटोत आपण अनुष्का शर्माच्या मांडीवर वामिकाला पाहू शकतो. दुसर्‍या फोटोत विराट कोहली वामिकाला उचलून तिच्यासोबत खेळताना दिसत आहे. तिसर्‍या फोटोत आपल्याला वामिका आणि विराटचे पाय दिसू शकतात आणि चौथ्या फोटोत आपल्याला एक अप्रतिम केक दिसेल. हे फोटो पाहून असे दिसते की विराट आणि अनुष्का वामिकासमवेत एका पार्कमध्ये छोट्या सहलीला गेले होते, ही त्याच वेलची छायाचित्रे आहेत.

पाहा अनुष्काची पोस्ट :

हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, “तिचे एक हास्य आमचे संपूर्ण जग बदलू शकते, मला आशा आहे की आम्ही दोघेही या प्रेमावर खरे ठरू, जितक्या प्रेमाने तू आम्हाला पाहतेस, चिमुकली परी.. आमच्या तिघांनाही 6 महिन्यांच्या शुभेच्छा.” विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांना हे फोटो खूप पसंत पडत आहेत. एवढेच नव्हे तर, या दोघांचेही सर्व चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत. ही छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहेत.

सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय

अनुष्काने सांगितलं की विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु.

(Baby Vamika completes 6 months anushka sharma share cute photos)

हेही वाचा :

VIDEO : मंदिरा बेदीचा आईसोबत वॉक; पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच स्पॉट!

Net Worth | दुसऱ्यांदा पालक बनलेयत हरभजन सिंह-गीता बसरा, जाणून घ्या कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाबद्दल…

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.