Badshah: ‘तू कब मरेगा?’, केके यांच्या निधनावरील पोस्ट लिहिल्यानंतर रॅपर बादशाहला केलं ट्रोल

गायक आणि रॅपर बादशाहनेसुद्धा (Badshah) इन्स्टाग्रामवर केके यांच्यासाठी पोस्ट लिहिली. मात्र त्या पोस्टवरून त्याला ट्रोल करण्यात आलं. काही वेळानंतर त्याने या ट्रोलिंगचा (Trolling) स्क्रीनशॉट पोस्ट करत नाराजी व्यक्त केली.

Badshah: 'तू कब मरेगा?', केके यांच्या निधनावरील पोस्ट लिहिल्यानंतर रॅपर बादशाहला केलं ट्रोल
BadshahImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 11:36 AM

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक केके (Singer KK) यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. केके यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली लिहिली. गायक आणि रॅपर बादशाहनेसुद्धा (Badshah) इन्स्टाग्रामवर केके यांच्यासाठी पोस्ट लिहिली. मात्र त्या पोस्टवरून त्याला ट्रोल करण्यात आलं. काही वेळानंतर त्याने या ट्रोलिंगचा (Trolling) स्क्रीनशॉट पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. बादशाहने केके यांचा फोटो पोस्ट करत ‘का’ असं लिहिलं होतं. त्यावरून एका नेटकऱ्याने त्याला डीएम (डायरेक्ट मेसेज) करत ‘तू कब मरेगा’ (तू केव्हा मरशील?) असा प्रश्न विचारला. संबंधित युजरने बादशाहसाठी अपशब्दही वापरले.

‘दररोज आम्हाला कशाप्रकारच्या नकारात्मक कमेंट्सचा सामना करावा लागतो, याची कल्पना देण्यासाठी हा पोस्ट केला आहे. तुम्ही जे पाहता ते भ्रम आहे, जे ऐकता ते खोटं आहे. काही जण तुम्हाला भेटण्यासाठी मरतात, तर काही जण तुम्ही मरण्यासाठी प्रार्थना करतात’, असं त्याने लिहिलं. संबंधित युजरची कमेंट पोस्ट करताना बादशाहने त्याचं नाव उघड केलं नाही. बादशाहचं खरं नाव आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया असून हिंदी आणि पंजाबी गाण्यांसाठी तो प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमधील त्याची बरीच गाणी गाजली. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिॲलिटी शोमध्ये तो परीक्षक म्हणूनही सहभागी झाला होता.

बादशाहची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

केके हे दोन दिवसांच्या कोलकाता दौऱ्यावर गेले होते. दोन महाविद्यालयांमध्ये त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंगळवारी कार्यक्रमादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. हॉटेलवर परतल्यानंतर त्यांना त्रास झाला आणि रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.