Shah Rukh Khan | या कारणामुळे शाहरुख खान रूम बंद करून मुलांसोबत ढसाढसा रडायचा…

बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे हा वाद सुरू झालाय.

Shah Rukh Khan | या कारणामुळे शाहरुख खान रूम बंद करून मुलांसोबत ढसाढसा रडायचा...
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 5:43 PM

मुंबई : शाहरुख खान हा त्याच्या पठाण या चित्रपटामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. शाहरुख हा तब्बल चार वर्षांनी पठाण चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. मात्र, पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू आहे. काहींनी तर शाहरुख खान याला जिवंत जाळण्याची धमकी दिलीये. तर काही लोक बेशर्म रंग हे गाणे चित्रपटातून हटवण्याची मागणी करत आहेत. या वादामध्ये थेट मध्यप्रदेशाच्या गृहमंत्र्यानी उडी घेतली. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे हा वाद सुरू झालाय.

पठाण चित्रपटावरून मोठा वाद सुरू आहे. इतकेच नाहीतर सोशल मीडियावर सतत बायकॉट पठाणची मागणी सुरू आहे. परंतू हे सर्व सुरू असतानाच दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान हे पठाण चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सांगितले की, माझ्या आयुष्यामध्ये मी असे काही दिवस पाहिले आहेत की, 2014 मध्ये मी माझ्या मुलांसोबत एका रूममध्ये बसून रडत बसायचो. त्यावेळी खूप जास्त त्रास व्हायचा.

शाहरुख खान पुढे म्हणाला की, 2014 मध्ये आयपीएलचे मॅच हे अबू धाबी येथे सुरू होते. मात्र, त्यावेळी आमची टीम सतत मॅच हारत होती. परंतू ही हार मला सहनच झाली नाही. कारण जेंव्हा टीम हारते, त्यावेळी खूप जास्त दु:ख होते.

जेंव्हा टीम हारायची त्यावेळी मी आणि माझे मुले एका रूममध्ये दरवाजा बंद करून रडत बसायचो. मात्र, त्यानंतर आयपीएल मॅच हे भारतामध्ये झाले आणि आमची टीम जिंकायला लागली.

जेंव्हा आपली टीम हारते, त्यावेळी प्रचंड त्रास होतो. 2023 मध्ये पठाण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र, चित्रपटाचे गाणे रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू आहे. बायकॉट पठाणचा परिणाम चित्रपटावर कसा होतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.