शहनाज गिल हिच्याकडे बाॅलिवूडच्या अनेक चित्रपटांच्या ऑफर, बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच अभिनेत्रीचे नशीब उजळले

चाहत्यांनी बिग बाॅसच्या घरात असताना शहनाज गिल हिला खूप प्रेम दिले. सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची जोडी फेमस होती.

शहनाज गिल हिच्याकडे बाॅलिवूडच्या अनेक चित्रपटांच्या ऑफर, बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच अभिनेत्रीचे नशीब उजळले
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 4:22 PM

मुंबई : किसी का भाई किसी की जान या चित्रपटामधून बाॅलिवूडमध्ये (Bollywood) धडाकेबाज पध्दतीने बिग बाॅस १३ फेम शहनाज गिल ही पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे थेट सलमान खान याच्यासोबत शहनाज गिल (Shehnaaz Gill) या चित्रपटामध्ये काम करणार आहे. किसी का भाई किसी की जान हा चित्रपट २१ एप्रिल २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शहनाज गिल हिने पंजाबी चित्रपटांपासून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. इतकेच नाहीतर शहनाज गिल ही एक गायिका देखील आहे. बिग बाॅस १३ मधून शहनाज गिल हिला खरी ओळख मिळालीये. चाहत्यांनी बिग बाॅसच्या घरात असताना शहनाज गिल हिला खूप प्रेम दिले. सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची जोडी फेमस होती. मात्र, अचानक सिद्धार्थ शुक्ला याने जगाचा निरोप घेतल्यानंतर शहनाज गिल मोठ्या धक्क्यात होती.

बिग बाॅसचे घर हे बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठीचे दार असल्याचे अनेकदा म्हटले जाते. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे बिग बाॅसच्या घरात दाखल होण्याच्या अगोदर शहनाज गिल हिला फक्त पंजाबमध्ये ओळखले जायचे. मात्र, आता संपूर्ण भारतामध्ये शहनाजला ओळखले जाते आणि थेट बाॅलिवूड चित्रपटामध्ये काम करण्याची संधी तिला मिळालीये.

फक्त किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्येच शहनाज गिल दिसणार नसून शहनाजकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर असून लवकरच निखिल आडवाणी यांच्या चित्रपटामध्ये शहनाज गिल ही महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.

चित्रपट निर्माती रिया कपूर हिच्या चित्रपटामध्ये देखील शहनाज गिल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे रिया कपूर हिच्या चित्रपटामध्ये शहनाज गिल ही अनिल कपूर आणि भूमि पेडनेकर यांच्यासोबत काम करणार आहे.

चित्रपटासाठी शहनाज गिल ही खूप जास्त मेहनत घेताना दिसत आहे. शहनाज ही सध्या अभिनयाचे क्लास घेत असून पूर्ण मेहनत करत आहे. प्रोड्यूसर निखिल आडवाणी याचा चित्रपट पाच महिलांवर आधारित आहे.

निखिल आडवाणी याच्या चित्रपटामध्ये शहनाज गिल ही वाणी कपूर हिच्यासोबत काम करणार आहे. या चित्रपटाची गेल्याच वर्षी शूटिंग होणार होती. परंतू काही कारणामुळे शूटिंग होऊ शकली नाही.

यंदाच्या वर्षी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होईल. भोपाळमध्ये चित्रपटाची शूटिंग केली जाणार आहे. यामुळे शहनाज गिल हिच्यासाठी २०२३ हे वर्ष अत्यंत खास ठरणार आहे. किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच शहनाजकडे चित्रपटाच्या आॅफर येत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.