सर्वात उंचीवर असलेल्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला ‘बेलबॉटम’, आनंद व्यक्त करताना अक्षय कुमार म्हणाला…
बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा 'बेलबॉटम' (BellBottom) हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट रिलीज झाल्यावर पुन्हा एकदा बंद तिकीट खिडकीवर गडबड सुरू झाली आहे.
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा ‘बेलबॉटम’ (BellBottom) हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट रिलीज झाल्यावर पुन्हा एकदा बंद तिकीट खिडकीवर गडबड सुरू झाली आहे. अभिनेत्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. यामुळेच हा चित्रपट जगातील सर्वात उंचीवर असलेल्या चित्रपटगृहातही प्रदर्शित झाला आहे. ही माहिती स्वतः अक्षय कुमारने शेअर केली आहे.
अक्षय कुमारने ही माहिती ट्विट करताना लिहिले की, ‘हा चित्रपट समुद्र सपाटीपासून 11562 फूट उंचीवर असलेल्या लेहमधील एका मोबाईल थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.’ अक्षयने लिहिले, ‘लडाखच्या लेह येथील जगातील सर्वोच्च मोबाईल थिएटरमध्ये बेलबॉटमचे प्रदर्शन झाले, तेव्हा माझे हृदय अभिमानाने भरून गेले. 11562 फूट उंचीवरील हे थिएटर -28 डिग्री सेल्सियसवर काम करू शकते. किती आश्चर्यकारक आहे हे.’
पाहा अक्षय कुमारचे ट्विट
Makes my heart swell with pride that BellBottom was screened at World’s highest mobile theatre at Leh in Ladakh. At an altitude of 11562 ft, the theatre can operate at -28 degrees C. What an amazing feat! pic.twitter.com/5ozbpkTCIb
— Akshay Kumar (@akshaykumar) August 29, 2021
कोरोना महामारी दरम्यान, अक्षय कुमार हा एकमेव अभिनेता आहे ज्याने आपला ‘बेल बॉटम’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचे धाडस केले. या अभिनेत्याचा चित्रपट भरपूर कमाई देखील करत आहे. या निर्णयाचे आणि अक्षयच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘बेल बॉटम’मध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी आणि आदिल हुसेन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
अजूनही काही ठिकाणी चित्रपटगृहे बंद आहेत. यामुळे चित्रपटाचे खूप नुकसान झाले आहे. मात्र, निर्मात्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी सरकारच्या निर्णयांचा आदर केला. अक्षय कुमारचा शेवटचा चित्रपट ‘गुड न्यूज’ने पहिल्याच दिवशी 17.56 कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिस इंडियाच्या मते, अक्षय कुमार आणि वाणी कपूरच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 50 टक्के भोगवटासह सुमारे 3 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
विमान हायजॅक प्रकरणावर चित्रपटाची कथा आधारित
‘बेल बॉटम’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. 1984 मधील विमान हायजॅक प्रकरणावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. हायजॅक केलेले विमान तसेच त्यातील प्रवाशांना सुखरुप वाचवण्याचे आव्हान भारत सरकारपुढे आहे. त्यामुळे सरकार एका कर्तव्यदक्ष आणि चाणाक्ष अशा माणसाच्या शोधात आहे. त्यानंतर ही जबाबदारी बेल बॉटम नावाचा कोड असेल्या रॉ अधिकाऱ्यावर सोपवलेली आहे. याच रॉ अधिकाऱ्याची भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे.
बेल बॉटम कोड असलेला रॉचा अधिकारी हा अत्यंत हुशार आहे. त्याचे लग्न झालेले आहे. त्याची बुद्धी अतिशय तीक्ष्ण असून, तो नॅशनल लेव्हलचा चेस प्लेअर आहे. तो गाणे शिकवतोय. तसेच हिंदी, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच अशा अनेक भाषा त्याला अवगत आहेत.
210 प्रवाशांना सुखरुप सोडवण्याचा टास्क
हायजॅक केलेले हे विमान दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवताना चित्रपटाची कथा ही पाकिस्तान, दुबई, अबुधाबी तसेच लंडन अशा ठिकाणी फिरते. बेल बॉटम कोड असलेल्या रॉ अधिकाऱ्याकडे फक्त सात तास आहेत. या सात तासांत त्याला एकूण 4 हायजॅकर्सचा सामान करायचा आहे. तसेच 210 प्रवाशांना सुखरुप सोडवायचे आहे.
चित्रपटात दिग्गजांची भूमिका
या चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर, हुमा कुरेशी, लाला दत्ता, अनिरुद्ध दवे, अदील हुसैन असा दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती वासू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनिषा अडवाणी आणि निखिल अडवाणी यांनी केली आहे. तर रणजित तिवारी यांचं दिग्दर्शन आहे. हा चिपत्रट विनोद, थरार अशी सरमिसळ असलेला चित्रपट आहे.
हेही वाचा :
अल्ताफ राजाच्या गाण्यातून मिळाली खास ओळख, चित्रांगदा सिंग सध्या काय करतेय?
‘पटोला’पासून ते ‘नाच मेरी रानी’ पर्यंत, ऐका गुरु रंधावाची हिट गाणी