Video | इतकी बदलली की ओळखू देखील येईना! पाहा ‘बेल बॉटम’मध्ये कसं बदललं लारा दत्ताचं रूपडं…

सगळेच चाहते अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 19 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

Video | इतकी बदलली की ओळखू देखील येईना! पाहा ‘बेल बॉटम’मध्ये कसं बदललं लारा दत्ताचं रूपडं...
लारा दत्ता
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 5:22 PM

मुंबई : सगळेच चाहते अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 19 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा ट्रेलरही मंगळवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत वाणी कपूर (Vani Kapoor), हुमा कुरेशी (Huma Qureshi) आणि लारा दत्ता (Lara Dutta) यांच्याही चित्रपटात दमदार भूमिका आहेत. ट्रेलर समोर आल्यानंतर चित्रपटाची बरीच चर्चा रंगली आहे. विशेषत: लारा दत्ताचे खूप कौतुक होत आहे. चित्रपटात तिचा लूक आणि मेकओव्हर थक्क करणारा आहे. या लूकमध्ये लारा दत्ताला एका दृष्टीक्षेपात ओळखणे कठीण आहे.

ट्रेलरमध्ये दाखवलेल्या दृश्यांमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा दाखवण्यात आली आहे, ज्या सर्व आदेश जारी करत आहेत. चित्रपटात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री 55-60 वर्षांची स्त्री नाही, तर ती एक तरुण आणि सुंदर अभिनेत्री आहे. पंतप्रधानांची भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्य कोणी नसून लारा दत्ता आहे. लारा दत्ताला या व्यक्तिरेखेत पाहून, लगेच ओळखणे कठीण आहे. लारा दत्ताचे हे पात्र इंदिरा गांधींनी प्रेरित आहे आणि ती अगदी त्यांच्यासारखीच दिसते. केस आणि साडी परिधान करण्याची शैली देखील इंदिरा गांधींसारखीच आहे, जी लारा दत्ताने संपूर्णपणे कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही भूमिका करण्यासाठी लाराने प्रोस्थेटिक्स मेकअपचा वापर केला आहे.

चार जणांनी मिळून केला मेकअप

आता अभिनेत्री लारा दत्ताचा मेकअप व्हिडीओ समोर आला आहे, जो स्वतः अक्षय कुमार आणि चित्रपटाच्या उर्वरित स्टारकास्टने शेअर केला आहे. प्रेक्षक लारा दत्तच्या मेकअप आर्टिस्टचे खूप कौतुक करत आहेत. दरम्यान अक्षयने एक बीटीएस व्हिडीओ शेअर केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘पात्र जिवंत करण्यासाठी काय केले गेले. लारा दत्ता तू या भूमिकेत उत्तम अभिनय केला आहेस.’ लारा दत्ताचा संपूर्ण मेक-अप व्हिडीओमध्ये दाखवण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

लाराच्या चेहऱ्यावर मेकअप आर्टिस्ट कसा मेकअप करत आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. चार मेकअप कलाकार एकत्र लाराला तयार करताना दिसत आहेत. या फास्ट फॉरवर्ड व्हिडीओमध्ये लाराचा चेहरा काही क्षणात पूर्णपणे बदलतो.

19 ऑगस्टला रिलीज होणार चित्रपट

लाराचा हा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आणि तिचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर 19 ऑगस्ट रोजी 3D आणि सामान्य प्रिंटसह प्रदर्शित होईल. अक्षय कुमारने स्वतःच ‘बेल बॉटम’चा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज केला आहे. अक्षय आणि त्याची संपूर्ण टीम चित्रपटाच्या रिलीजसाठी खूप उत्साहित आहे.

(Bellbottom akshay kumar share Lara Dutta to Indira Gandhi Makeup BTS Video)

हेही वाचा :

माझ्या बायकोचं नाव जेनेलिया नाही, रितेश देशमुखने खरं नाव सांगितलं!

 एव्हरग्रीन चित्रपटाची 27 वर्षे, जाणून घ्या ‘हम आपके हैं कौन’च्या खास गोष्टी

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.