Bhagyashree: ‘मैंने प्यार किया’ फेम भाग्यश्रीचं लग्नानंतर असं बदललं आयुष्य; म्हणाली “घरात पाऊल टाकताच..”

1990 मध्ये भाग्यश्रीने हिमालय यांच्याशी लग्नगाठ बांधली. या दोघांना अभिमन्यू दासानी आणि अवंतिका दासानी ही दोन मुलं आहेत. भाग्यश्रीने पती हिमालय (Himalay Dassani) यांच्यासोबत 1989 मध्ये 'कैद मे है बुलबुल', 1992 मध्ये 'त्यागी' आणि 'पायल' या चित्रपटांमध्ये काम केलं.

Bhagyashree: 'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीचं लग्नानंतर असं बदललं आयुष्य; म्हणाली घरात पाऊल टाकताच..
BhagyashreeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 7:45 AM

बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला यश मिळतंच असं नाही. अनेकांच्या पदरी अपयश येतं, तर काहींना अगदी पहिल्याच चित्रपटातून जबरदस्त प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळते. पण मिळालेलं हे यशसुद्धा प्रत्येकाला टिकवता येत नाही. बॉलिवूडमधल्या अशाच काही कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree). भाग्यश्रीचं नाव घेतलं की ‘मैने प्यार किया’ (Maine Pyar Kiya) या चित्रपटाचं नाव आपसूकच समोर येतं. भाग्यश्रीच्या या पहिल्यावहिल्या चित्रपटाला प्रचंड यश आणि लोकप्रियता मिळाली. मात्र नंतर तिने लग्न आणि कुटुंबीयांना प्राधान्य देत बॉलिवूडमधील करिअरला रामराम केला. लग्नानंतर पतीच्या स्वभावामुळे अनेक चित्रपटांना नकार द्यावा लागल्याचं भाग्यश्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. घरात पाऊल टाकताच तिचं आयुष्य बदलून जायचं, असंही तिने सांगितलं. भाग्यश्रीने 1989 मध्ये ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाचून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने सलमान खानसोबत भूमिका साकारली होती. भाग्यश्रीने पती हिमालय (Himalay Dassani) यांच्यासोबत 1989 मध्ये ‘कैद मे है बुलबुल’, 1992 मध्ये ‘त्यागी’ आणि ‘पायल’ या चित्रपटांमध्ये काम केलं.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्री म्हणाली, “मी अशा घरात लग्न केलं ज्याचा चित्रपटांशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे बाहेरचं जीवन कसं आहे हे त्यांना काही समजू शकलं नाही. लग्नानंतरही जेव्हा मी चित्रपटसृष्टीत काम करत होती तेव्हा घरात पाऊल टाकताच माझं आयुष्य बदलून जायचं. मी अभिनेत्री भाग्यश्री राहिले नव्हते आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इतर गृहिणीप्रमाणेच कराव्या लागतील आणि ते सर्व मी करत होते.”

काम आणि पतीविषयी सांगताना ती पुढे म्हणाली, “त्यावेळी मला त्यांच्यासोबत काम करायला नक्कीच आवडलं असतं. पण ज्याप्रकारचे सिनेमे बनवले जात होते आणि त्यात पोझेसिव्ह पती असल्याचं मला माझ्या चित्रपटांच्या निवडीचा आवाका कमी करावा लागला. ते खरंच खूप पोझेसिव्ह होते. मी त्यांच्याशिवाय एक-दोन चित्रपट केले पण माझ्या निवडीच्या मर्यादा वाढल्या. चित्रपटात रोमान्स असेल आणि त्यासारखी दृश्ये असतील तर ते करण्यात मी कम्फर्टेबल नव्हते. त्यामुळे त्या चित्रपटांना हो म्हणणं माझ्यासाठी अशक्यप्राय होतं. त्यावेळी मी माझ्या नात्याला प्राधान्य दिलं होतं.”

हे सुद्धा वाचा

भाग्यश्रीने घर आया मेरा परदेसी (1993), सौतन की सौतन (1997), हमको दिवाना कर गए (2006), रेड अलर्ट: द वॉर विदिन आणि ‘सीतारामा कल्याण’ (2019) यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. तिने 2005 मध्ये ‘स्टुडिओ वन’ या टेलिव्हिजन सीरिजचं दिग्दर्शनही केलं. 1990 मध्ये भाग्यश्रीने हिमालय यांच्याशी लग्नगाठ बांधली. या दोघांना अभिमन्यू दासानी आणि अवंतिका दासानी ही दोन मुलं आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.