भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्यावर करण जोहर याची कृपा, थेट या चित्रपटात दिली संधी
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना मोठी संधी ही करण जोहर याने दिली आहे. यामुळे भारती सिंह हिचे चाहते आनंदात आहेत. करण जोहर याने ही संधी या दोघांना दिलीये.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून करण जोहर (Karan Johar) हा त्याच्या आगामी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. करण जोहर याच्या या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हे मुख्य भूमिकेत आहेत. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाची शूटिंग सध्या काश्मीर येथे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे (Movie) प्रमोशन करत असताना रणबीर कपूर हा म्हणाला होता की, आलिया हिच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचे शूटिंग सध्या काश्मीर येथे सुरू असून आलिया मुलगी राहा हिला घेऊन काश्मीर येथे गेलीये आणि मी त्या दोघींनाही प्रचंड मिस करतोय.
काही दिवसांपूर्वी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो लीक झाले होते. या फोटोमध्ये रणवीर सिंह हा दिसत होता. यावेळी चित्रपटातील गाण्याचे शूटिंग सुरू असल्याचे सांगितले जात होते. रणवीर सिंह हा जबरदस्त लूकमध्ये दिसत होता. विशेष म्हणजे हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांमधील उत्साह चांगलाच वाढला.
आता करण जोहर याच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे येतंय. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये काॅमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांची झलक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये त्यांचा केमिओ असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारती सिंह ही चाहत्यांना पोटधरून हसवताना दिसत आहे. भारती हिने एका गोंडस बाळाला जन्म दिलाय, ज्याचे नाव लक्ष ठेवले आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंह याचा सर्कस हा चित्रपट रिलीज झाला होता.
गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह याचे चित्रपट एका मागून एक फ्लाॅप जाताना दिसत आहेत. रोहित शेट्टी आणि रणवीर सिंह हे सर्कस चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला. सर्कस हा चित्रपट फ्लाॅप झाल्याने रोहित शेट्टी याला मोठा धक्का बसला. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.
गेल्या काही दिवसांपासून सतत बाॅलिवूडचे चित्रपट हे बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट याला अपवाद ठरला. शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. विशेष म्हणजे शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.