Bhavna Pandey | अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या रिलेशनवर अभिनेत्रींच्या आईने केले मोठे भाष्य, थेट म्हणाली
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. अनन्या आणि आदित्य एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. मात्र, आता यासंदर्भात मोठी अपडेट पुढे येत आहे. अनन्याच्या आईने यावर भाष्य केले आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चंकी पांडे (Chunky Panday) याची लेक अनन्या पांडे प्रचंड चर्चेत आहे. अनन्या पांडे ही आदित्य रॉय कपूर याला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे अनेकदा हे दोघेसोबत स्पाॅट होतात. मात्र, खरी चर्चा आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अनन्या पांडे यांनी केलेल्या खास फोटोशूटनंतर रंगली. अत्यंत बोल्ड फोटोशूट अनन्यां पांडे हिने आदित्य रॉय कपूर यांच्यासोबत केले आहे. हे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. काही दिवसांपूर्वी अनन्या पांडे हिचे नाव शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा लेक आर्यन खान याच्यासोबत देखील जोडले जात होते.
आदित्य रॉय कपूर याला अनन्या पांडे डेट करत असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. आता या चर्चांवर अखेर अनन्या पांडे हिची आई भावना पांडे हिने माैन सोडले असून अनन्याच्या आईने मोठा खुलासा केला आहे. अनन्याची आई भावना पांडे यांनी स्पष्ट केले की, अजूनही अनन्या पांडे ही सिंगलच आहे.
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या रिसेप्शनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे सोबत पोहचले होते. इतकेच नाहीतर अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे नेहमीच सोबत स्पाॅट देखील होतात. यांचे फोटोशूटही चर्चेचा विषय आहे. एका मुलाखतीमध्ये भावना पांडे यांनी अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या रिलेशनवर भाष्य केले आहे.
भावना पांडे म्हणाल्या की, इंडस्ट्रीमध्ये या सर्व गोष्टी होतात. लिंक-अपच्या चर्चा सुरू असतात. अभिनेता असो किंवा अभिनेत्री त्यांच्या लाईफचा हा एक भाग आहे. त्यामुळेच इंडस्ट्रीच्या चांगल्या वाईट गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. पुढे भावना यांनी एक अत्यंत मोठा आणि महत्वाचा मेसेज दिला आहे. भावना पांडे यांनी अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांना खास मेसेज दिला आहे.
भावना म्हणाल्या, निगेटिव गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रेमावर फक्त लक्ष द्यायला हवे. प्रत्येकांने सर्वात अगोदर चांगला माणूस व्हायला हवे. म्हणजे अनन्या पांडे हिच्या आईने अनन्या ही सिंगल आहे, हे स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी अनन्या पांडे हिचा लाईगर हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. या चित्रपटाचे अपयश हे अनन्या पांडे हिच्यावर फोडण्यात आले होते.