Bhediya First Look : वरुण धवन बनलाय खतरनाक ‘भेडिया’, अभिनेत्याचा जबरदस्त लूक पाहिलात का?

बऱ्याच दिवसांपासून वरुण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेनन (Kriri Sanon) यांच्या 'भेडिया' (Bhediya)  या चित्रपटाची चर्चा होती. हा हॉरर कॉमेडी चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटातील वरुण धवनच्या पात्राचा फर्स्ट लूक पोस्टर आता रिलीज करण्यात आला आहे.

Bhediya First Look : वरुण धवन बनलाय खतरनाक ‘भेडिया’, अभिनेत्याचा जबरदस्त लूक पाहिलात का?
Varun Dhawan
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 2:20 PM

मुंबई : बऱ्याच दिवसांपासून वरुण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेनन (Kriri Sanon) यांच्या ‘भेडिया’ (Bhediya)  या चित्रपटाची चर्चा होती. हा हॉरर कॉमेडी चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटातील वरुण धवनच्या पात्राचा फर्स्ट लूक पोस्टर आता रिलीज करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये वरुण धवन खूपच खतरनाक दिसत आहे. त्याचे हे पोस्टर रिलीज झाल्यापासून त्याच्या व्यक्तिरेखेची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे.

वरुण धवनने आज (25 नोव्हेंबर) सकाळी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ‘भेडिया’चा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला आहे. ज्यामध्ये वरुण खतरनाक लूकमध्ये दिसत आहे. त्याचा लूक खूपच भयानक आहे. त्याचे डोळे लांडग्यासारखे चमकत आहेत. पोस्टर पाहता तो या चित्रपटात ‘भेडिया’च्या भूमिकेत झळकणार असल्याचे दिसते. या चित्रपटाच्या पोस्टरवर ‘भेडिया’ एका वेगळ्या शैलीत लिहिण्यात आले आहे आणि त्यावर पंजाच्या खुणा करण्यात आल्या आहेत. पोस्टर या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढवत आहे.

हॉरर कॉमेडी कथा

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री’चे निर्मात्यांनी हा चित्रपट तयर केला आहे. ‘स्त्री’चे दिग्दर्शक अमर कौशिक हेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ‘स्त्री’ने बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा रोवला होता. आता दिनेश विजान आणि अमर कौशिक ‘भेडिया’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा चित्रपट हॉरर कॉमेडी प्रकारातील असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरून हॉररचे संकेत मिळाले आहेत, आता त्याचा टीझर आल्यावर कळेल की या चित्रपटात किती कॉमेडी आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर सेलिब्रिटींसह चाहत्यांच्या भरपूर कमेंट्स येत आहेत.

पाहा पोस्टर :

View this post on Instagram

A post shared by BHEDIYA (@varundvn)

वरुणच्या लुकचे कौतुक

वरुण धवनच्या या पोस्टरवर आलिया भट्टने कमेंटमध्ये फायर इमोजी पोस्ट केला आहे. दुसरीकडे, ज्युनियर बच्चनने टाळ्यांचा इमोजी शेअर करून लूकचे कौतुक केले आहे. हुमा कुरेशीने ‘वुल्फ व्हिसल’ लिहिले असून त्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तुसार शेट्टीने हार्ट इमोजी शेअर केला आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांसोबत अभिषेक बॅनर्जी आणि दीपक डोबरियाल देखील दिसणार आहेत. एवढी मोठी स्टारकास्ट असताना, चित्रपटात कॉमेडीची छटा नक्कीच असणार आहे. हा चित्रपट 25 नोव्हेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा, मोठ्या पडद्यावर दिसणार ‘पावनखिंड’चा अजरामर इतिहास!

Marathi Movie | प्रेमाची अनोखी केमिस्ट्री, यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला तरुणाई म्हणणार ‘वन फोर थ्री’!

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.