Bhool Bhulaiyaa 2: कार्तिकचा ‘भुल भुलैय्या 2’ कंगनाच्या ‘धाकड’वर पडतोय भारी; पहिल्याच दिवशी दमदार कमाई

कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'लव्ह आज कल' या चित्रपटाला 'भुल भुलैय्या 2'ने मागे टाकलं आहे.

Bhool Bhulaiyaa 2: कार्तिकचा 'भुल भुलैय्या 2' कंगनाच्या 'धाकड'वर पडतोय भारी; पहिल्याच दिवशी दमदार कमाई
Dhaakad and Bhool Bhulaiyaa 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 2:33 PM

अनीस बाझमी दिग्दर्शित ‘भुल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. कुठलीही सुट्टी नसताना आणि कंगना रनौतच्या ‘धाकड’शी टक्कर असतानाही कार्तिक आर्यनची (Kartik Aaryan) मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये पहिल्याच दिवशी दमदार कमाई करणाऱ्यांमध्ये ‘भुल भुलैय्या 2’चा समावेश झाला आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये अभिनेत्री तब्बूचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. शुक्रवारी ‘भुल भुलैय्या 2’ने 14.11 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याबद्दलची माहिती दिली आहे. अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ आणि आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’च्या तुलनेत कार्तिकच्या या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे. मात्र RRR किंवा केजीएफ: चाप्टर 2 सारख्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनला हा चित्रपट मात देऊ शकला नाही. (Box Office Collection)

कार्तिक आर्यनच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाला ‘भुल भुलैय्या 2’ने मागे टाकलं आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी 12.40 कोटींचा गल्ला जमवला होता. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भुल भुलैय्या’चा हा सीक्वेल आहे. पहिल्या भागात अक्षय कुमार आणि विद्या बालनने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या सीक्वेलमध्ये मंजुलिका हे पात्र आणि तिचं ‘आमी जे तोमार’ हे गाणं सोडल्यास पहिल्या भागाशी काहीही साम्य नाही.

हे सुद्धा वाचा

भुल भुलैय्या 2- 14.11 कोटी रुपये बच्चन पांडे- 13.25 कोटी रुपये गंगुबाई काठियावाडी- 10.50 कोटी रुपये

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट-

दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनपुढे बॉलिवूड चित्रपट फारशी चांगली कमाई करत नसल्याची गेल्या काही दिवसांत चर्चा होती. मात्र आता ‘भुल भुलैय्या 2’मुळे पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटांमध्ये सकारात्मकता पसरली आहे. कार्तिक आणि कियारासोबतच यामध्ये तब्बू आणि राजपाल यादव यांच्याही भूमिका आहेत. दिग्दर्शक अनिस बाजमीने याआधी नो एंट्री, वेलकम, सिंग इज किंग यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. त्यामुळे कॉमेडीचाही योग्य प्रमाणात तडका त्याने ‘भुल भुलैय्या 2’मध्ये दिला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.