मुंबई : सध्या नवनवीन चित्रपट (Movies), मालिका (Series) आणि वेब शो (Web Show) आपल्या भेटीला येत आहेत. हे सगळे शो प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन देखील करत आहेत. त्यातच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर (Amazon Prime Videos) नवनवीन वेब सीरीजची मेजवानी मिळते आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पृथ्वीराज अभिनीत मल्याळम क्राईम थ्रिलर, भ्रमम (Bhramam) याची घोषणा केली आहे. भ्रमम हा चित्रपट येत्या 7 ऑक्टोबर 2021 ला भारतात प्रदर्शित होत होणार आहे.
पृथ्वीराज सुकुमारन, उन्नी मुकुंदन, राशी खन्ना, सुधीर कारामना आणि ममता मोहनदास प्रमुख भूमिकेत
‘भ्रमम’ या चित्रपटामध्ये पृथ्वीराज सुकुमारनसोबत उन्नी मुकुंदन, राशी खन्ना, सुधीर कारामना आणि ममता मोहनदास यांच्यासारखे अनेक प्रतिभाशाली कलाकार प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. रवि. के. चंद्रन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एपी इंटरनेशनल आणि वायकॉम-18 स्टूडियोजच्या बॅनरअंतर्गत निर्मित करण्यात आला आहे.
या चित्रपटाची कथा फार रंजक आणि प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी असणार आहे. हा चित्रपट एका पियानो वादकाच्या द्वंद्वावर आधारित असून ही व्यक्तिरेखा अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनने उत्तम रित्या साकारली आहे. हा व्यक्ती अंध असल्याचे फक्त नाटक करत असतो. त्याची संगीत यात्रा सस्पेंस, प्रेरणा, भ्रम आणि नाटक यांच्यासोबत जोडली जाते कारण तो एका मर्डर मिस्ट्रीमध्ये अडकत जातो. चित्रपटाची कथा जशी जशी पुढे जाते, ती विचित्र घटना आणि व्यंगातील आरोप-प्रत्यारोपात अडकत जाते, यात संगीतकार जेक्स बिजॉय यांचे देखील मोठं योगदान आहे.
दिग्दर्शक रवि. के. चंद्रन यांनी व्यक्त केल्या भावना
दिग्दर्शक रवि. के. चंद्रन यांनी, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर होत असलेल्या आपल्या चित्रपटाच्या प्रीमियर विषयी सांगितलं की “मला या सुंदर प्रोजेक्टसाठी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओसोबत सहयोग करताना आनंद होतो आहे. त्यामुळे ओरिजनल प्रोडक्शनच्या आणखी वरच्या पायरीवर जाऊन चित्रपटाच्या कथेत नाटक आणि विनोदाच्या अनोख्या तत्वांना संगीताच्या मुख्य पंचसोबत एकत्रित करू शकलो आहोत. मला आनंद आहे की आम्ही सिनेमॅटोग्राफीला पुढे नेत चित्रपटाच्या कथेसोबत आमच्या रचनात्मक दृष्टिला प्रत्यक्षात आणण्यात यशस्वी ठरलो आहोत. आम्हाला आशा आहे कि एका प्रतिभाशाली टीमसोबत, आम्ही एक असा चित्रपट बनवण्यात यशस्वी झालो आहोत जो प्रेक्षकांचे भरपुर मनोरंजन करेल.”
संबंधित बातम्या
Bigg Boss Marathi 3 | ‘देवमाणूस’ फेम सोनाली पाटील, सुरेखा कुडची, अरुण गवळीचा जावई कन्फर्म?
Monalisa Bagal : ‘नव्या नात्यांचा श्रीगणेशा’मध्ये पाहा अभिनेत्री मोनालिसा बागलचा मनोरंजक परफॉर्मन्स!