मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित तू झूठी मैं मक्कार (Tu Jhoothi Main Makkaar) हा चित्रपट आज रिलीज झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाकडून निर्मात्यांना प्रचंड अपेक्षा देखील आहेत. शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी केलीये. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात होते. पठाण चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. पठाण चित्रपटानंतर अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा सेल्फी आणि कार्तिक आर्यन याचा शहजादा हे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले.
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे बिग बजेटचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. मात्र, याला पठाण हा चित्रपट अपवाद ठरलाय. धमाकेदार कामगिरी या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर केलीये. बाॅलिवूडचे चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच सोशल मीडियावर चित्रपटाच्या विरोधात वातावरण बघायला मिळते आणि चित्रपट फ्लाॅप जातात.
आज 8 मार्च रोजी रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, रिपोर्टनुसार तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट आॅनलाईन लीक झालाय. चित्रपट निर्मात्यांना हा मोठा झटका नक्कीच असणार आहे. कारण यामुळे सरळ सरळ चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिसवर परिणाम होतो.
तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट काही साईट्सवर उपलब्ध आहे. यामुळे आता थेट फटका चित्रपटाला बसण्याची शक्यता आहे. हा चित्रपट काही साईटवर एचडीमध्येही अपलोड करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. चित्रपट निर्मात्यांना चित्रपटाकडून चांगल्या कमाईची अपेक्षा आहे. रणबीर कपूर यानेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले.
तू झूठी मैं मक्कार या चित्रपटातील गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडले. या गाण्याला प्रेक्षकांनी प्रेम दिले. या चित्रपटात रणबीर कपूर पहिल्यांदाच श्रद्धा कपूर हिच्यासोबत रोमांन्स करताना दिसणार आहे. बोनी कपूर देखील या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रद्धा कपूर हिने देखील या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन केले. श्रद्धा कपूर ही तब्बल तीन वर्षांनंतर बाॅलिवूडच्या चित्रपटामध्ये पदार्पण करताना दिसणार आहे.
श्रद्धा कपूर ही तब्बल तीन वर्ष मोठ्या पदद्यापासून दूर होती. तू झूठी मैं मक्कार या चित्रपटात रणबीर कपूर याच्यासोबत श्रद्धा कपूर ही मुख्य भूमिकेत आहे. हे पहिल्यांदाच चित्रपटामध्ये सोबत काम करताना दिसणार आहे. एका मुलाखतीमध्ये श्रद्धा कपूर हिला विचारण्यात आले होते की, इतके दिवस कुठे गायब होती…लग्नाची तयारी करत होती का? यावर श्रद्धा कपूर हिने हो म्हटले होते.