मुंबई : पोन्नियिन सेल्वन (Ponniyin Selvan) चित्रपटाला रिलीज होण्याच्या अगोरदच मोठा धक्का बसलाय. हा चित्रपट आज म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी मल्याळम, हिंदी, तेलगू, तामिळ आणि कन्नड भाषेमध्ये रिलीज (Release) झालाय. मात्र, कॅनडामध्ये राहणारे लोक या चित्रपटाचे तामिळ व्हर्जन (Tamil version) पाहू शकणार नाहीयेत. पोन्नियिन सेल्वनमुळे सातत्याने धमक्या मिळत असल्याने लास्ट वेळी हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे याचा सरळ सरळ फटका हा चित्रपटाच्या बाॅक्स ऑफिस कलेक्शनवर होणार आहे.
पोन्नियिन सेल्वन चित्रपटाची सुरूवातीपासूनच जोरदार चर्चा होती. पोन्नियिन सेल्वन चित्रपटाच्या दोन भागांचे बजेट तब्बल 500 कोटी रूपये आहे. हा चित्रपट सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. ऐश्वर्या राय बच्चन, चियान विक्रम, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला हे या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये आहेत.
हिंदी व्हर्जनमध्ये चित्रपट धमाका करणार असल्याचे सांगण्यात येतंय. गुरुवारी 29 सप्टेंबर रोजी वितरण कंपनी KW टॉकीजने प्रेक्षकांना माहिती देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, सातत्याने धमक्या मिळत असल्याने पोन्नियिन सेल्वन चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
तामिळ व्हर्जन कॅनडामध्ये लोक बघू शकणार नसल्याने याचा चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होणार आहे. पोन्नियिन सेल्वनच्या डिजिटल स्ट्रीमिंगचे अधिकार ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मला विकले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे टीम चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचली होती. मात्र, त्यावेळी ऐश्वर्या राय उपस्थित नसल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या.