पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

| Updated on: Dec 13, 2022 | 4:26 PM

राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय.

पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याचे नाव पोर्नोग्राफी प्रकरणात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. इतकेच नाहीतर याच प्रकरणी राज कुंद्राला तब्बल दोन महिने जेलमध्ये राहावे देखील लागले होते. 2021 मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. शर्लिन चोप्रा हिने याच प्रकरणात राज कुंद्रासोबत अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्यावर देखील गंभीर आरोप केले. मुंबईच्या फाईव्ह स्टार हाॅटेलमध्ये राज कुंद्रा हा अश्लील व्हिडीओ तयार करून कोट्यावधी रूपयांमध्ये हे विकत असल्याचा आरोप आहे.

राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. फक्त राज कुंद्राच नाहीतर याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शर्लिन चोप्रा, पूनम पांडे आणि उमेश कामत यांनाही दिलासा दिलाय.

सर्वोच्च न्यायालयाने राज कुंद्रा, पूनम पांडे, शर्लिन चोप्रा, उमेश कामत यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. परंतू याप्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या पतीचे पाय खोलात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करताना म्हटले आहे की, सर्व आरोपींनी तपासात सहकार्य करावे. इतेकच नाहीतर गरज पडल्यास तपासात सहभागी व्हावे.

मागच्या महिन्यातच महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. शिल्पा शेट्टीच्या पतीचे नाव पॉर्नोग्राफी प्रकरणात आल्याने अनेकांनी शिल्पा शेट्टीवर टीका केली होती.

शर्लिन चोप्रा हिने काही दिवसांपूर्वी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप केले होते. इतकेच नाहीतर याप्रकरणात शिल्पा शेट्टी देखील सहभागी असल्याचे तिने म्हटले होते.