सोनम कपूरला मोठा धक्का, संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता?

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यासोबत काम करणे हे प्रत्येक स्टारचे स्वप्न असते. भन्साळी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. भन्साळी सध्या त्यांच्या पुढच्या चित्रपटात आणि वेब सीरिज हिरामंडीमध्ये व्यस्त आहे.

सोनम कपूरला मोठा धक्का, संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता?
सोनम कपूर
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 1:42 PM

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यासोबत काम करणे हे प्रत्येक स्टारचे स्वप्न असते. भन्साळी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. भन्साळी सध्या त्यांच्या पुढच्या चित्रपटात आणि वेब सीरिज हिरामंडीमध्ये व्यस्त आहे. अशा परिस्थितीत, अलीकडेच बातमी आली होती की, ते आता पुन्हा सोनम कपूर (Sonam Kapoor) हिच्यासोबत काम करणार आहेत. मात्र ही गोष्ट फक्त एक अफवा ठरली आहे.

दीपिका पदुकोण, रणबीर कपूर आणि कार्तिक आर्यन काही काळापूर्वी भन्साळींच्या कार्यालयाबाहेर दिसले होते. मात्र, संजयच्या जवळच्या मित्राने ही बैठक अनौपचारिक असल्याचे स्पष्ट केले. यासोबतच अलीकडे सोनम कपूर देखील संजयच्या कार्यालयाबाहेर दिसली होती.

सोनम भन्साळींच्या चित्रपटात दिसणार नाही!

सोनम जेव्हा भन्साळींच्या कार्यालयाबाहेर दिसली, तेव्हा ती लवकरच पुन्हा दिग्दर्शकासोबत काम करणार अशी अटकळ होती. तथापि, आता असे स्पष्ट झाले आहे की, असे काहीही होणार नाहीय. स्पॉटबॉयच्या बातमीनुसार, बाकीच्या स्टार्सप्रमाणे सोनमसुद्धा फक्त संजयला भेटायला गेली होती.

बातमीनुसार, असे बरेच कलाकार आहेत जे संजय भन्साळींना भेटायला येतात, आणि दिग्दर्शकाशी बोलतात. एखाद्याला भेटणे याचा अर्थ एकत्र काम करणे नाही. म्हणजेच सोनम भन्साळींसोबत पुन्हा काम करेल अशी चाहत्यांची आशा आता मोडली आहे. तसे, जेव्हा जेव्हा भन्साळी त्याच्या कोणत्याही चित्रपटाची घोषणा करतात, तेव्हा ते विशेष असते, अशा स्थितीत आता हे पाहावे लागेल की, स्टार्सची ही भेट फक्त औपचारिक होती, की आणखी काही वेगळी गोष्ट आहे.

संजयसोबत सोनमचे पदार्पण

संजय लीला भन्साळी यांनीच सोनम कपूर लाँच केले होते. सोनमने रणबीर कपूरच्या बरोबरीने भन्साळींच्या ‘सावरिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट 2007 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा चित्रपट काही विशेष जादू करू शकला नाही. जर, आपण सोनम कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोललो तर सोनम कपूर लवकरच तिचा ‘ब्लाइंड’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शोम मखीजा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात सोनम एका अंध व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 2011 च्या कोरियन चित्रपटाचे अडेप्टेशन आहे. या चित्रपटात सोनम कपूर सिरीयल किलरचा शोध घेणाऱ्या अंध पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा :

दिव्या अग्रवालला अभिनेत्री सनी लिओनीची साथ, पाहा खास फोटो

‘या’ टीव्ही स्टार्सनी पडद्यावर निभावली ‘श्री कृष्णा’ची भूमिका, चाहत्यांकडून मिळाले प्रचंड प्रेम!

प्रभास आणि पूजा हेगडेच्या ‘राधेश्याम’ची उत्सुकता; जन्माष्टमीच्या निमित्ताने नव्या पोस्टरचे अनावरण!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.