अक्षय कुमार याच्यासह सेल्फी चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा धक्का, रिलीजच्या पहिल्याच दिवशी थेट…

अक्षय कुमार हा बाॅलिवूडमधील एकमेव असा अभिनेता आहे, त्याचे एका वर्षामध्ये तब्बल चार चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येतात. विशेष म्हणजे त्याचे जवळपास सर्वच चित्रपट हे बिग बजेटचे असतात.

अक्षय कुमार याच्यासह सेल्फी चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा धक्का, रिलीजच्या पहिल्याच दिवशी थेट...
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 4:09 PM

मुंबई : अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या आगामी सेल्फी या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत होता. शेवटी हा चित्रपट आज 24 फेब्रुवारी रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाच्या बाॅक्स ऑफिस कलेक्शनकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट 2023 मधील पहिला रिलीज झालेला चित्रपट (Movie) आहे. अक्षय कुमार याच्यासाठी 2022 हे वर्ष काही खास गेले नाही. कारण 2022 मध्ये अक्षय कुमार याचे एका मागून एक असे चित्रपट बाॅक्स ऑवर फ्लाॅप गेले.

अक्षय कुमार हा बाॅलिवूडमधील एकमेव असा अभिनेता आहे, त्याचे एका वर्षामध्ये तब्बल चार चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येतात. विशेष म्हणजे त्याचे जवळपास सर्वच चित्रपट हे बिग बजेटचे असतात. मात्र, कोरोनानंतर अक्षय कुमार याची जादू प्रेक्षकांवर राहिली नसल्याचे दिसत आहे. त्याचे चित्रपट सतत फ्लाॅप जात आहेत.

25 ऑक्टोबर 2022 रोजी अक्षय कुमार याचा राम सेतू हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. त्या अगोदर अक्षय कुमार याचा रक्षाबंधन हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 ला रिलीज झाला होता, हा चित्रपट देखील बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेला. त्यानंतर आता 2023 मध्ये त्याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झालाय.

सेल्फी या चित्रपटाकडून अक्षय कुमार याच्यासोबत चित्रपट निर्मात्यांनी मोठा अपेक्षा आहेत. आता हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सेल्फी या चित्रपटाबद्दल एक अत्यंत मोठी बातमी पुढे येतंय. अक्षय कुमार याच्यासह चित्रपट निर्मात्यांना मोठा झटका लागणार आहे.

रिपोर्टनुसार रिलीजच्या अवघ्या काही तासांमध्ये सेल्फी हा चित्रपट लीक झालाय. यामुळे याचा मोठा फटका बॉक्स ऑफिस कलेक्शनवर बसू शकतो. विशेष म्हणजे सेल्फी चित्रपटाची फुल एचडी प्रिंट ऑनलाइन लीक झालीये. सेल्फी या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी हे मुख्य भूमिकेत असून हे पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी हे मुंबई मेट्रोमध्ये सेल्फी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसले होते. यावेळी त्यांनी थेट मुंबई मेट्रोमध्ये डान्सही केला. यावेळी मेट्रोमधील प्रवाशांना अक्षय कुमार हा मेट्रोमध्ये दिसल्याने मोठा धक्का बसला होता. यावेळी अक्षय कुमार याने काही चाहत्यांसोबत सेल्फी देखील घेतल्या होत्या.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.