Lock Upp : कंगना रनौतच्या ‘लॉकअप’मध्ये शहनाझ गिल येणार?

अभिनेत्री कंगना रनौत हिचा 'लॉक अप' नावाचा एक कार्यक्रम येत आहे. या शोचं कंगना अँकरिंग करणार आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री शहनाझ गिल सहभागी होणार असल्याची सध्या चर्चा होतेय.

Lock Upp : कंगना रनौतच्या 'लॉकअप'मध्ये शहनाझ गिल येणार?
कंगना रनौत, शहनाज गिल
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 3:53 PM

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचा ‘लॉक अप(Lock Up) नावाचा एक कार्यक्रम येत आहे. या शोचं कंगना अँकरिंग करणार आहे. एकता कपूरचा (Ekta Kapoor) हा नवा कार्यक्रम Alt Balaji आणि MX Player वर प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री शहनाझ गिल (Shahnaz Gill) सहभागी होणार असल्याची सध्या चर्चा होतेय. तिचे चाहते याविषयी सोशल मीडियावर पोस्ट करून तिला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. शहनाझने या कार्यक्रमात सहभागी व्हावं म्हणून तिला सपोर्ट करत आहेत. याबाबत शहनाझने मात्र अजून कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

Lock Upp मध्ये शहनाज जाणार?

बिग बॉसचा 13 वा सिझन गाजवलेली अभिनेत्री शहनाझ गिल आता कंगनाच्या नव्या कार्यक्रमात येणार असल्याचं बोललं जातंय. कंगनाच्या लॉकअप या शोसाठी शहनाज गिलला विचारणा केली गेली असल्याची माहिती आहे. याला शहनाजनेही होकार दिला असल्याचं कळतंय. शहनाजचा जवळचा मित्र सिद्धार्थ शुक्लाचं निधन झाल्यानंतर शहनाझ आयुष्याच्या कठीण काळातून जातेय. त्यामुळे तिने या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी या शोमध्ये जावं, असं तिचे चाहते म्हणत आहेत. बिग बॉससारखंच ती या शोमध्ये देखील चांगलं खेळेल, असा विश्वास तिचे चाहते व्यक्त करत आहेत.

वीर दासचा ‘लॉक अप’ला नकार

कंगनाच्या ‘लॉक अप’ या कार्यक्रमात वीर दास सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय. यावर वीर दासने स्पष्टीकरण दिलं आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, “ज्यांनी मी या कार्यक्रमात सहभागी होणार असं कोण बोललं मला माहीत नाही. बरेच लोक माझ्याबद्दल लिहित आहेत. पण त्यांनी माझ्याशी संपर्क न करता हे लिहिलं आहे. मला त्यात रसही नाही. ‘लॉक अप’साठी कंगना आणि तिच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा!”

कंगना पहिल्यांदाच करणार कार्यक्रम होस्ट

कंगना पहिल्यांदाच एक रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. पण या व्यतिरिक्त कंगनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच सध्याही तिच्या काही चित्रपटांचं चित्रिकरण सुरू आहे. चुकतंच तिचा ‘थलायवी’ आला होता. ‘धाकड’ आणि ‘तेजस’या सिनेमांमधून ती लवकरच मोठ्या पडद्यावर तिच्या चाहत्यांना पुहायला मिळणार आहे. या चित्रपटांचं शूटिंग जवळपास पूर्ण झालं आहे. याशिवाय कंगना तिच्या वादग्रस्त विधानांसाठीही प्रसिद्ध आहे.

संबंधित बातम्या

डॅशिंग दीपिकाचा बोल्ड लुक, गेहराईयाँच्या प्रमोशनसाठी खास ड्रेसची चॉईस, आतापर्यंतचे 4 टॉप फोटो

VIDEO | रणवीर सिंगच म्हणतो ही तर छोटी दीपिका, ‘रामलीला’तील भन्नाट डायलॉग व्हायरल

आईच्या वाढदिवसाला खास ‘ठेवणीतले फोटो’, सेम टू सेम सारा-अमृता, फोटो पाहाच…

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.